ज्येष्ठ नागरिकांना बचतीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी FD हा एक पर्याय ठरू शकतो. काही स्मॉल फायनान्स बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8.5% पर्यंत व्याजदर देत आहेत. (banks) याशिवाय सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील काही बँकांमधील गुंतवणुकीवरही चांगला परतावा मिळत आहे. चला तर मग याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

सेवानिवृत्तीनंतर कष्टाने जमवलेली बचत सुरक्षित ठेवण्यासोबत त्यातून नियमित परतावा मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. (banks) त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवींना (FD) प्राधान्य देतात. जर तुम्हालाही तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील आणि चांगला परतावा मिळवायचा असेल, तर ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची वेळ आहे. सध्या काही लहान-मोठ्या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वर 8.5% पर्यंत व्याजदर देत आहेत. त्यामुळे योग्य बँक आणि कालावधी निवडल्यास बचतीवर चांगला परतावा मिळू शकतो. चला तर कोणत्या अशा बँका आहेत ज्या एफडीवर उत्तम परवा देत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना FD वर तुलनेने अधिक परतावा देणाऱ्या काही स्मॉल फायनान्स बँकांमध्ये इक्विटास, ESAF, शिवालिक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे. या बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना FD वर 8.50% पर्यंत व्याजदर मिळत असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.याशिवाय जना आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 8.30% पर्यंत, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 8.25% पर्यंत, तर AU स्मॉल फायनान्स बँक 7.90% आणि स्लाईस स्मॉल फायनान्स बँक 7.75% पर्यंत व्याज देत असल्याचे सांगितले आहे.ही गोष्ट लक्षात ठेवा की, FDचे व्याजदर कालावधी आणि बँकेच्या अद्ययावत नियमांनुसार बदलू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित बँकेच्या माहिती जाणून घ्या.
केवळ लहान बँकाच नव्हे, तर अनेक खाजगी आणि परदेशी बँकादेखील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी चांगले दर देत आहेत. एसबीएम बँक इंडिया मुदत ठेवींवर 8.15% पर्यंत व्याज देत आहे, जो गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय आहे. तर डीसीबी बँक देखील 8 % व्याज देत आहे, आणि बंधन बँक 7.95% व्याज देत आहे. इंडसइंड बँक आणि येस बँक 7.75% पर्यंत व्याजदर देतात. आरबीएल बँक 7.70%, सिटी युनियन बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक 7.50% व्याज देत आहेत. कोटक महिंद्रा बँक 7.30%, ॲक्सिस बँक 7.20%, आणि एचडीएफसी व आयसीआयसीआय बँक 7.10% व्याज देत आहेत. परदेशी बँकांमध्ये, स्टँडर्ड चार्टर्ड बँक 7.10%, डॉइच बँक 7.00%, आणि एचएसबीसी बँक 6.00% व्याज देत आहे.
सरकारी बँकांमध्येही चांगला व्याजदर मिळतो. तुमचा जर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर अधिक विश्वास असेल, तर तिथेही परिस्थिती बरीच चांगली आहे. बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांना 7.45% पर्यंत व्याजदर देत आहे. पंजाब अँड सिंध बँक 7.35% पर्यंत व्याजदर देते. तर बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया 7.25% पर्यंत परतावा देतात. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन बँक 7.15% पर्यंत व्याजदर देतात. कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब नॅशनल बँक 7.10% पर्यंत दर देतात. देशातील सर्वात मोठ्या बँका, एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) आणि युनियन बँक ऑफ इंडिया 7.05% पर्यंत व्याजदर देतात.
व्याजदरांमधील अगदी लहान फरकाचाही तुमच्या एकूण परताव्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, विशेषतः जेव्हा गुंतवणुकीची रक्कम मोठी असते. 5 लाखांच्या विमा संरक्षणात संपूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, तज्ञ तुमच्या ठेवी वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागण्याची शिफारस करतात. याव्यतिरिक्त, (banks) अधिक परताव्यासाठी निवडक स्मॉल फायनान्स बँकांचा वापर करा आणि वेळेवर पैसे मिळतील याची खात्री करण्यासाठी तुमच्या रोख रकमेच्या गरजेनुसार ठेवीचा कालावधी ॲडजस्ट करावा लागतो.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?