अनिल परब यांना मोठा दिलासा, मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता?

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पालिका अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परब यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पालिका अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परब यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जून 2023 मध्ये वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाची शाखा पडल्यावरून अभियंत्याला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी अनिल परब, माजी नगरसेवक सदानंद परब यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (Anil Parab) याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.मुंबई महापालिकेच्या पालिकेच्या एच पूर्व विभागाच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता (परिरक्षण) अजय पाटील यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी अनिल परब यांच्यासह इतरांवर सरकारी कामात अडथळला आणल्याचा आणि अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा वाकोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. (Anil Parab) त्यावेळी सदा परब यांच्यासह इतरांना अटकही करण्यात आली होती. आज या प्रकरणाचा निकाल आला असून सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

जून 2023 मध्ये वांद्रे येथील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय पालिकेनं अनधिकृत म्हणून पाडलं होतं. (Anil Parab) त्याच्या निषेधार्थ परब आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ एच-पूर्व प्रभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असतानाही आमचं पक्ष कार्यालय उद्ध्वस्त करणारे अधिकारी कोण होते? असं परब आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं होतं. या मोर्चावेळी पालिकेचे काही कर्मचारी पुढे आले होते, त्यावेळी कार्यकर्त्यांनी बीएमसीचे सहाय्यक अभियंता अजय पाटील यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना धमकी दिली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, तसेच अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणाचा निकाल लागला असून परब आणि इतरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?