मृत निलेश कोतकर यांच्या पत्नींचे मनपा आयुक्तांसोबत फोन वरून संभाषण झाले. महिलेने रडत मनपा आयुक्तांजवळ फोनवरून आपली व्यथा मांडली. त्यांनी शिक्षणानुसार नोकरी देण्याचे आश्वासन दिले.

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. निलेश कोतकर या तरुणाचा रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे मृत्यू झाला. मृत निलेश कोतकर यांचे नातेवाईक आज सार्वजनिक बांधकाम विभागाबाहेर ठिय्या आंदोलनाला बसले होते. मृत निलेश कोतकर यांच्या पत्नीला पालिकेत नोकरी द्यावी, (conversation) अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे. दोन तासापासून सार्वजनिक बांधकाम अभियंत्याच्या दालनाबाहेर बसलेल्या मृत कुटुंबीयांची अखेर मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी भेट घेतली. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या मृत निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांची अतिरिक्त आयुक्त सुवर्ण दखणे यांनी देखील भेट घेतली.
मृत निलेश कोतकर यांच्या पत्नींचे मनपा आयुक्तांसोबत फोन वरून संभाषण झाले. महिलेने रडत मनपा आयुक्तांजवळ फोनवरून आपली व्यथा मांडली. त्यांनी शिक्षणानुसार नोकरी देण्याचे आश्वासन दिले. शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्याकडून पीडित कोतकर कुटुंबाला 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली, (conversation) तर पक्षाकडून मदतीसाठी लवकरच निर्णय घेणार प्रवीण तिदमे यांची माहिती.पीडित कुटुंबासमोरच दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपली. शिंदेंच्या सेनेचे महानगरप्रमुख नगरसेवक प्रवीण तिदमे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे गट नेते केशव पोरजे एकमेकांना भिडले. सत्तेतून बाहेर पडून आमच्या सोबत लढा ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेत्याने शिंदेंच्या नगरसेवकांना आव्हान केले. सत्ताधारी असून तुम्ही आंदोलन करता, महापालिकेत तुम्हाला बोलू दिले जात नाही ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या नगरसेवकांना डिवचलं.
ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेपाठोपाठ आता नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी ही रस्त्यावर उतरणार आहे. राष्ट्रवादीच्या मनपा गटनेत्यांकडून खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा घेण्यासाठी महापौरांना पत्र देण्यात आलं. (conversation) राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांकडून थेट रस्त्यावर उतरण्याचा महापालिकेला इशारा दिला. नाशिक शहरात पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने विरोधकांसह सत्ताधारी ही आक्रमक. शहरातील संपूर्ण रस्त्यांवर खड्डे पडल्याने खड्ड्यांच्या प्रश्नावर महासभा घेण्यासाठी विरोधकांसह सत्ताधारी पक्षांची भाजपकडे विनवणी.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?