शिवसेना ठाकरे गटातून झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर पुन्हा चर्चेत आले आहेत. सहा खासदारांनी एकाचवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर (political) त्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून पुढील काही दिवस विशेष बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बंडखोरीनंतर वाढला तणाव शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटाची वाट धरल्यानंतर राजकीय वातावरण तापले. या सर्व खासदारांपैकी बहुतांश जणांना सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी हलवण्यात आले होते. ते दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र ओमराजे निंबाळकर यांनी पुणे सोडण्याऐवजी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे राज्यातच राहण्याचा निर्णय घेतला. (political) याच काळात त्यांच्या वडिलांशी संबंधित पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या प्रकरणाचा निकाल मुंबईत लागला. निकालाच्या दिवशी ओमराजे निंबाळकर आपल्या कुटुंबीयांसह न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी न्यायालयाबाहेर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईहून परतल्यानंतर त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेरही काही शिवसैनिक जमल्याची माहिती समोर आली.
आठवडाभर सुरक्षा कायम घडामोडींची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव येथील निवासस्थानी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर आता पुढील आठ दिवस ही सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बंदोबस्त वाढवण्यासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. या व्यवस्थेनुसार दिवसा एक अधिकारी आणि पाच पोलिस कर्मचारी त्यांच्या निवासस्थानी तैनात असतील. दरम्यान, सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून ‘ऑपरेशन तुडवा’ची घोषणा करण्यात आली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून संबंधित खासदारांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतराचा निर्णय कार्यकर्त्यांशी संवाद साधून घेतल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरे करण्याची घोषणा केली असून 26 जून रोजी ते धाराशिवमध्ये जाणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (political) त्याचवेळी ओमराजे निंबाळकर जिल्ह्यात शिंदे गटाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते आपली भूमिका सातत्याने मांडत आहेत.
हेही वाचा :
समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?