ठाणे जिल्हा परिषदने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात केली आहे.(launched) यंदा जिल्हा परिषद स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छतेवरही लक्ष देणार आहेत.

स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छताही महत्वाची ! ठाणे जिल्हा परिषदेच्या(launched) वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छताही महत्वाची ! ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात “हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता” या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. ‘स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ या टॅगलाइनखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम सांस्कृतिक मंत्रालय, पेयजल व स्वच्छता विभाग आणि राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्रकल्प(launched) संचालक पंडित राठोड यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोहिमेचा उद्देश केवळ स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणे नसून, स्वच्छतेबद्दल जनजागृती निर्माण करून प्रत्येक घर, परिसर आणि गाव स्वच्छ ठेवणे हा आहे.
उपक्रमाचे स्वरूप
या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, जलकुंभ व पाणीपुरवठा सुविधा सुशोभीकरण, स्वच्छता घटकांचे देखभाल व सजावट यावर विशेष भर दिला जाणार आहे. गावागावात विद्यार्थी आणि युवक स्वच्छता रॅली काढतील, तसेच घराघरात रांगोळ्या, सजावट करून स्वच्छतेचा संदेश दिला जाईल.
मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे
लोकसहभागातून राष्ट्रीय अभिमान आणि स्वच्छतेची भावना वृद्धिंगत करणे.
शाश्वत पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्यासाठी आवश्यक उपक्रम राबविणे.
नागरिक व विद्यार्थ्यांकडून ‘स्वच्छ सुजल गाव’ प्रतिज्ञा घेणे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
१२ ऑगस्ट: जलजीवन मिशन अंतर्गत पाणी टाक्या, नळजोडण्या, पंप हाऊस यांची स्वच्छता व सुशोभीकरण.
१३ ऑगस्ट: कचरा व्यवस्थापन, शौचालय देखभाल, जलसंधारण आणि प्लास्टिक टाळण्याबाबत जनजागृती.
१४ ऑगस्ट: गावातील सार्वजनिक ठिकाणांची अंतिम स्वच्छता व सजावट.
१५ ऑगस्ट: स्वच्छता चॅम्पियन आणि स्वयंसेवकांचा सत्कार.
राबविले जाणारे उपक्रम
या चार दिवसांच्या मोहिमेत विविध महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येतील. त्यामध्ये —
नाल्यांची स्वच्छता
सांडपाणी व्यवस्थापन
पाण्याची गळती शोधून थांबवणे
सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता
घनकचरा व्यवस्थापन केंद्रे स्वच्छ करणे
प्लास्टिक व्यवस्थापन आणि वापर कमी करण्यासाठी जनजागृती
नागरिकांचा सहभाग आवश्यक
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, स्वच्छतेचा संदेश फक्त सरकारी यंत्रणेमधून नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागातून पसरवला जावा. विद्यार्थ्यांनी रॅली, घोषवाक्ये, पोस्टर प्रदर्शन यामार्फत स्वच्छतेचा प्रचार करावा, तसेच महिलांनी आणि ग्रामस्थांनी घरासमोर व सार्वजनिक ठिकाणी सजावट, रांगोळी व झेंडे लावून देशभक्तीची आणि स्वच्छतेची जाणीव वाढवावी.
हेही वाचा :
हार्दिक पंड्यासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे
सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत सरकारला महत्वाचा आदेश
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर