ऐन सणासुदीत साखरेच्या दरात किंचित घसरण झाली असून, किरकोळ बाजारात सरासरी दर 60 रुपये प्रति किलो खाली आले आहेत. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत साखर अजूनही थोडी महागडीच आहे. देशाच्या विविध भागांमध्ये किमतीत मोठी तफावत असून, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाव कमी झाले आहेत.

ऐन सणासुदीच्या काळात घरात गोडधोड बनवण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण साखरेच्या भावात किंचित घसरण झाली आहे. आज चौथ्या दिवशी देशात साखरेचा किरकोळ बाजारातील सरासरी रेट 60 रुपये प्रति किलो पेक्षा खाली आला आहे. (sugar) तथापी हा मोठा दिलासा नाहीये. कारण साखर अजूनही ऑगस्टच्या तुलनेत किंचित महागडीच आहे. ग्राहक संरक्षण खात्याच्या आकडेवारीनुसार, सोमवारी साखरेचा किरकोळ बाजारातील रेट सरासरी 59.57 रुपये प्रति किलो होता. गेल्या महिन्यात हाच दर 58.99 एवढा होता. म्हणजेच गेल्या महिन्याच्या तुलनेत साखर थोडीशी महागडीच आहे.
11 सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच साखरेचा किरकोळ रेट सरासरी 60 रुपये प्रति किलोच्या खाली आला आहे. (sugar) त्यानंतर काही दिवस किमतीमध्ये घसरण दिसून आली. सोमवारी सरासरी रेट मागच्या दिवसाच्या तुलनेत थोडा वाढला आहे. विशेष म्हणजे 21 ऑगस्ट रोजी साखरेचा किरकोळ बाजारातील रेट सरासरी 58.23 रुपये प्रति किलो होता. म्हणजे सध्याची सरासरी किमत थोडी वाढलेलीच आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या दिवसातही हा मोठा दिलासा असल्याचं मानलं जात आहे.
40 ते 85 रुपये किलो पर्यंत देशभरात साखरेच्या किमतीत बरंच अंतर आहे. सोमवारी किरकोळ बाजारातील साखरेचा किमान रेट 40 रुपये प्रति किलो होता. तर कमाल रेट 85 रुपये किलोपर्यंत होता. म्हणजे सरासरी किमत भलेही 60 रुपयांच्या खाली असेल, पण अनेक मार्केटमध्ये ग्राहकांना त्यापेक्षा अधिक भावात साखर खरेदी करावी लागत आहे. सणासुदीच्या काळात मिठाईसह इतर गोड पदार्थांची मागणी वाढल्याने त्याचा थेट परिणाम साखरेच्या किमतीवर झाला आहे.
दक्षिणेत वेगळंच चित्र दक्षिण भारतातील राज्यात साखरेचे भाव एकसारखे नाहीत. आंध्रप्रदेशात 21 ऑगस्ट रोजी सरासरी रेट 49.58 रुपये प्रति किलो होता. सोमवारी हा रेट प्रति किलो 55.56 रुपये झाला आहे. कर्नाटकातही साखरेचे भाव चांगलेच वाढलेले आहेत. तर तामिळनाडूत साखरेच्या भावात किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. केरळातही 21 ऑगस्ट रोजी साखरेचा सरासरी रेट 56.75 रुपये प्रति किलो होता. सोमवारी तो 57.80 रुपये प्रति किलो झाला.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यातील परिस्थिती काही वेगळी आहे. महाराष्ट्रात 21 ऑगस्ट रोजी किरकोळ बाजारात साखरेचा रेट 59 रुपये होता. तो कमी होऊन सोमवारी 58.22 रुपये प्रति किलो झाला आहे. उत्तर प्रदेशातही साखरेचे भाव घसरलेले आहेत. यूपीत सरासरी रेट 59.64 रुपयांवरून 57.88 रुपये प्रति किलो झाला आहे. मध्य प्रदेशात फार किमती घसरलेल्या नाहीत. या ठिकाणी सरासरी रेट 62.36 रुपयाने कमी होऊन 56.57 रुपये प्रति किलोवर गेला आहे. पश्चिम बंगालमध्येही किंचित घसरण झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये साखरेचा रेट 60.95 रुपयांनी घसरून 60.43 रुपये प्रति किलो झाला आहे.
साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने 21 ऑगस्ट रोजी साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. (sugar) त्यासोबतच घाऊक खरेदीदार आणि डिलरांसाठी स्टॉक ठेवण्यासाठीचे नियम अधिक कडक केले होते. बाजारात साखरेची उपलब्धता कायम राहावी आणि त्यावर नियंत्रण राहावं म्हणून सरकारने हे नियम कठोर केले आहेत. साखर कारखान्यांनीच साखरेचे भाव फुगवल्याचा आरोपही केंद्र सरकारने केला आहे. देशांतर्गत साखरेची मागणी पूर्ण करण्याएवढा साखरेचा साठा देशात आहे, असं सरकारचं म्हणणं आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?
हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?