लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी ₹१५०० दिवशी खात्यात जमा होणार

महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची लाखो महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. ६ ऑक्टोबर उजाडला तरी सप्टेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता अद्याप पात्र महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. (women) त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार, याकडे राज्यातील लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासोबतच महिलांना हप्ता कधी वितरित करायचा, यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते.

यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे हप्तेही सरकारकडून सणांच्या पार्श्वभूमीवर वितरित करण्यात आले होते. आता नवरात्रोत्सव सुरू असून दसऱ्याचाही सण जवळ आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत मिळावी, (women) यासाठी सप्टेंबरचा हप्ता लवकरच वितरित करण्याबाबत सरकारकडून निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, २५ ऑक्टोबरनंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाऊ शकते.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते. (women) त्यामुळे सप्टेंबरचा रखडलेला हप्ता कधी जमा होणार, याचा अंतिम निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा

ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय

शेतकरी तहानले अधिकारी गायब