एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात कोल्हापुरी तडका

पुण्यात २ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात कोल्हापूरचा आवाज घुमत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीच्या विवेकानंद पाटीलने आंदोलनात केलेली भाषणे सध्या राजकीय नेत्यांसह विद्यार्थी वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. (students) आपल्या भाषणांनी एमपीएससीच्या प्रश्नांवर आवाज उठवताना अभ्यास, ग्रामीण वास्तव, विनोद आणि राजकीय भाष्य यांची सांगड घालणारा हा तरुण सध्या विद्यार्थी आंदोलनाचा एक प्रभावी आवाज ठरत आहे.

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील विवेकानंद मारुती पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे. २४ वर्षीय विवेकानंद हा शेतकरी कुटुंबातील असून, त्याने राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षापासून त्याने एमपीएससीची तयारी सुरू केली. विवेकानंदच्या भाषणाची सर्वात मोठी ताकद म्हणजे अभ्यास, आक्रमक मांडणी आणि मिश्कील विनोद यांचा मिलाफ. कोल्हापुरी-ग्रामीण लहेजात तो गंभीर प्रश्न मांडताना मध्येच विनोद, उपरोध आणि टोलेबाजी करतो. (students) त्यामुळे भाषण केवळ आंदोलनाचे निवेदन न राहता ऐकणाऱ्याला खिळवून ठेवणारा संवाद बनतो. प्लेटो, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, कन्फ्युशियस यांच्यापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव ढसाळ यांच्यापर्यंतचे संदर्भ तो सहजपणे वापरतो.

विवेकानंदच्या भाषणाची दखल राजकीय वर्तुळानेही घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी फोन करून कौतुक केले आहे. आदित्य ठाकरे, सतेज पाटील यांच्यासह (students) अनेक नेत्यांनी त्याच्या वक्तृत्वाची दखल घेतली. खा. सुप्रिया सुळे व आ. रोहित पवार यांच्यासमोरही त्याने राजकीय फोडाफोडीवर मिश्कील टोले लगावले. सोमवारी ओमराजे निंबाळकर आंदोलनस्थळी आल्यानंतर झालेल्या गोंधळातही विवेकानंदने विद्यार्थ्यांना शांत करत ‘आपल्या आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका,’ अशी भूमिका घेतली. आंदोलनस्थळी तो सलग दीर्घकाळ भाषण करतो. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्याची, मोठ्या प्रमाणात पदभरती करण्याची मागणी तो मांडत आहे. आंदोलनात फूट पडल्याच्या चर्चेलाही तो आपल्या भाषणातून उत्तर देतो.

हेही वाचा : 

नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा

ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय

शेतकरी तहानले अधिकारी गायब