लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कायम नखं चावण्याची सवय असते.(invitation)नकळतपणे नखे चावून खाल्ली जातात. तर काही लोक नखांसोबत नखांच्या आजूबाजूला असलेली स्किनसुद्धा चावतात. यामुळे इन्फेक्शन किंवा आरोग्यासंबंधित आजारांचा धोका वाढतो. काहींना लहानपणापासूनच नखं चावण्याची सवय असते. तर काही तणाव, काळजी किंवा अस्वस्थ झाल्यानंतर नख चावून खातात. वारंवार नखं चावून खाल्ल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. डॉक्टरांच्या मते, नखे चावून खाण्याची सवय बऱ्याचदा चिंता विकार, आत्मविश्वासाचा अभाव किंवा ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डरच्या लक्षणांमुळे उद्भवते. नेहमीच नख चावून खाल्यामुळे तोंडातील बॅक्टरीया वाढतात. आज आम्ही तुम्हाला नखं चावून खाल्यामुळे कोणते आजार होण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

मानसिक आरोग्यावर परिणाम:
मानसिक संतुलन बिघडल्यानंतर बऱ्याचदा नखं चावून खाल्ली जातात. नखे चावून खाणे हे चिंता, नैराश्य किंवा तणावासंबंधित आजारांची लक्षणे आहेत. लहान मुलांमध्ये नख चावून खाण्याचे प्रमाण अधिक आहे.(invitation)मनातील आत्मविश्वास कमी झाल्यानंतर अनेक लोक नख चावून खातात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे.
‘या’ आजारांचा धोका वाढतो:
सतत नख चावून खाल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचा धोका वाढतो. नख चावल्यानंतर नखांमध्ये असलेली घाण थेट शरीराच्या आतमध्ये जाते, ज्यामुळे पोटाच्या समस्या किंवा इतर आजारांची लागण होण्याची भीती असते.नखांमुळे पोटाचे आजार, अन्न विषबाधा, उलट्या, अतिसार इत्यादी आजार होऊ शकतात. तसेच नेहमीच नख चावून खाल्यामुळे दातांच्या मुळांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
‘ही’ सवय सोडण्यासाठी उपाय:
आठवड्यातून एकदा नखं कापावीत. यामुळे नखांमधील घाण पोटात जाणार नाही.
नखांवर बँड-एड लावल्यास अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात.
ज्यावेळेस तुम्हाला नख चावून खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही बबल गम किंवा च्युइंग गम खाऊ शकता. यामुळे नख खाण्याची सवय मोडली जाईल.

नखे चावणे ही एक वैद्यकीय स्थिती आहे का?
नखे चावणे हे अधिकृतपणे मानसिक विकार म्हणून वर्गीकृत केलेले नसले तरी, ते ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर किंवा चिंता विकारांसारख्या आजारांशी संबंधित असू शकते(invitation). काही प्रकरणांमध्ये, ते एक प्रकारचे स्व-सौंदर्य वर्तन किंवा स्टिरियोटाइपिक हालचाली विकार मानले जाऊ शकते.
मुलांमध्ये नखे चावणे रोखणे शक्य आहे का?
जेव्हा एखाद्या मुलाला चावण्याची इच्छा होते तेव्हा त्यांना इतर कामांमध्ये सहभागी होण्यास किंवा त्यांचे हात दुसऱ्या गोष्टीसाठी वापरण्यास प्रोत्साहित करा.मुलांना ताणतणाव व्यवस्थापित करण्याच्या निरोगी मार्गांबद्दल शिक्षित करणे, जसे की खोल श्वास घेणे किंवा विश्रांती तंत्रे, फायदेशीर ठरू शकतात.
हेही वाचा :
खुशखबर! सोन्या – चांदीच्या दरात पुन्हा घसरण!
लाडक्या भावासाठी घरी बनवा सोपा आणि झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा शिरा
लाडकी बहीण योजनेत मोठा गोंधळ; 26.34 लाख अपात्र लाभार्थी, जुलैचे पैसे मिळणार का?