भाजपच्या वतीने इचलकरंजी बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविले

भारतीय जनता पार्टी इचलकरंजीच्या वतीने ‘संघटन पर्व – गाव बस्ती अभियान’ अंतर्गत स्वच्छता अभियान इचलकरंजी शहरातील बसस्थानक परिसरात मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. भाजप(political) प्रदेश स्तरावर सुरु झालेल्या संघटन पर्वाच्या दुसऱ्या दिवशी, इचलकरंजी शहरातील बसस्थानक परिसराची स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमामध्ये भाजपा(political) प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुरेशराव हाळवणकर, माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत मामा भोसले, वस्त्रउद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, तसेच शशिकांत मोहिते, बाळासाहेब माने, बाळासाहेब कलागते, मारुती पाथरवट, जहागीर पटेकरी, किसन शिंदे, धोंडीराम जावळे, श्रीरंग खवरे, राजू बोन्द्रे, बंडू मुळीक, अश्विनीताई कुबडगे, नामदेव सातपुते, हेमंत वरुटे, नितेश पोवार, वृषभ जैन, दीपक राशीनकर, महेश पाटील, सचिन पावळे, सनी ओऊळकर, उमकांत दाभोळे, अमित जावळे, राजेंद्र बचाटे, नीता भोसले आणि मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वच्छता राखण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेचा संदेश देताना सांगितले की, “स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि स्वच्छ भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अशा अभियानांचे विशेष महत्त्व आहे.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण परिसरात सफाई कामगारांसोबत भाजपा कार्यकर्त्यांनीही झाडू हातात घेऊन सफाई मोहीमेत सहभाग घेतला.

हेही वाचा :

झापुक झुपूक चित्रपट ‘या’ दिवशी फक्त 99 रुपयांत पाहता येणार!

भारतीय विद्यार्थ्याला पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिली गळे कापण्याची धमकी; Video Viral

आता काय पाकिस्तानचं खरं नाही! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचलले ‘हे’ मोठे पाऊल