दिल्लीमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या (leaders) राजीनाम्याची मागणी करत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ठरल्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. (leaders) यावेळी विरोधी पक्षातील अनेक खासदार आणि नेते उपस्थित होते. निवडणूक आयुक्तांनी विरोधकांची भेट घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.राहुल गांधी यांनी यावेळी पोलिसांकडून मोर्चा अडवला जात असल्याचा आरोप केला. सुमारे ३०० खासदार निवडणूक आयुक्तांना भेटू इच्छित आहेत, मात्र पोलिस त्यांना अडवत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आम्हाला पोलिसांकडून धमकावले जात आहे, त्याचे कारण काय, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. निवडणूक आयुक्तांनी विरोधकांची भेट घेतली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच आम्हाला आकाशवाणी भवनाजवळ थांबवून ठेवण्यात आले असून लोकशाहीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असा दावा त्यांनी केला. (leaders) यावेळी आंदोलकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही’, अशा घोषणा देत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपला विरोध व्यक्त केला. राहुल गांधींसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय