गोकुळ च्या सत्ताकारणात भाजप चे महत्त्व वाढले?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

कालपरवापर्यंत केवळ ग्राहक म्हणून नाते असलेला भारतीय जनता पक्ष सध्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे 25 जागांवर उमेदवार देण्याइतका सक्षम बनला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे हे शक्य झाले असले तरी भाजपच्या संचालकावर अध्यक्षपदाचा दुग्धाभिषेक होण्याची इथे शक्यता अगदीच कमी आहे.गोकुळ तथा कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ ही काँग्रेसने स्थापन केलेली व्यापारी संस्था आहे. (Bharatiya Janata Party) कालपर्यंत या संस्थेवर राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता होती. आनंदराव पाटील चुयेकर, महादेवराव महाडिक, हसन मुश्रीफ, सतेज पाटील वगैरेंच्या हातामध्ये गोकुळची सूत्रे होती. काँग्रेस संस्कृतीमध्ये रुळालेल्या नेत्यांच्याकडेच गोकुळ दूध संघ राहिला.

भारतीय जनता पक्ष हा सहकारात कधीच नव्हता. गोकुळचा ग्राहक इतकेच भाजपचे नाते या सहकारी संस्थेशी होते. भाजपकडे जिल्ह्यातील एकही सहकारी दूध संस्था नव्हती आणि आजही अगदीच नगण्य संस्था भाजपाकडे आहेत. इसवी सन 2014 मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले तेव्हा भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते बाबा देसाई यांना तज्ञ संचालक म्हणून गोकुळ वर पाठवण्यात आले होते. शिवसेनेकडे गोकुळचे संचालक मध्ये एकदा आले होते.गोकुळ दूध संघाच्या सत्ताकारणात आपणालाही कधीतरी महत्त्व येईल असे भाजपच्या स्वप्नातही आले नसेल. पण राज्याची आणि देशाची सूत्रे भाजपाकडे निर्विवादपणे आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे संदर्भ जसे बदलले तसेच ते जिल्हा पातळीवरही बदलले गेले. (Bharatiya Janata Party) महायुतीच्या माध्यमातून भाजपने गोकुळमध्ये चंचू प्रवेश करण्यात यश मिळवले आहे आणि इथल्या सत्ताकारणात आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असे म्हणण्याइतके स्थान मिळवले आहे.राज्य पातळीवरमहायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे. पण स्थानिक राजकारणात हे ज्येष्ठत्व भाजपला अनेक जिल्ह्यात मिळालेले नाही. गोकुळ दूध सहकारी संघाच्या निवडणुकीत भाजप तसा अगतिक बनलेला आहे.

इच्छा असूनही भाजपच्या संचालकावर अध्यक्षपदाचा दुग्धाभिषेक होणार नाही. कारण जागा वाटपात हसना मुश्रीफ यांनी आम्ही इथे मोठा भाऊ असल्याचे जाहीर करून भाजपला योग्य तो संदेश दिला आहे. आणि म्हणूनच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ यांच्याकडे दिले आहे. जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. आपले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी भाजपने सर्वच्या सर्व म्हणजे 25 जागांवर उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. कोणे एकेकाळी गोकुळ संघाच्या सत्ताकारणात दुरान्वयानेही संबंध नसलेला भाजप हा किंग किंवा किंग मेकर बनवण्याच्या भूमिकेत दिसतो आहे. इथे एक विशेष बाब मुद्दाम अधोरेखित करण्याचा मोह आवरत नाही. अगदी तीन वर्षांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांवर ईडीने अनेकदा धाडी टाकल्या होत्या. (Bharatiya Janata Party) त्यांचा कथित भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. कोणत्याही क्षणी त्यांना अटक केली जाईल असे वातावरण होते. येईल त्या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवली होती. पण अचानक राजकीय संदर्भ बदलले आणि भाजपला हसन मुश्रीफ यांच्या हाती महत्त्वाच्या संस्था द्याव्या लागल्या. ही नियतीने घडवून आणलेली भाजपसाठीची राजकीय शोकांतिका म्हणावी लागेल.

उमेदवारी अर्ज मागे घेतले गेल्यानंतर गोकुळ दूध संघाचे निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे. कोणाला किती जागा मिळणार हे सुद्धा त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून काही भूमिका घेता येईल असे वाटत नाही. कारण भाजपची ताकद नेमकी किती आहे हे त्यांना पूर्णपणे माहीत आहे. त्यामुळेच मोठा भाऊ म्हणून भाजपला त्यांनी लॉन्च केलेले नाही. हसन मुश्रीफ यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे देताना भाजपने धनंजय महाडिक किंवा एकूण महाडिक कुटुंबीयाला तसे फारसे महत्व दिलेले नाही हे सुद्धा या निमित्ताने पाहायला मिळते आहे.

हेही वाचा : 

दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले?

विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण?

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दुष्काळ जाहीर करा?