आजकाल पुरुष असोत वा महिला, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एका जोडीदाराच्या(partner) शोधात असत. अशात अधिकतर लोक हे आपल्या आवडीच्या व्यक्तीला इंप्रेस करण्याच्या तयारीत असत. विशेषतः पुरुष मंडळी! अनेक पुरुष हे महिलांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाय आणि युक्त्या शोधून काढत असतात. परंतु अनेक कमी लोकांना हे ठाऊक आहे की. पुरुषांतील काही ठराविक गोष्टींचा महिलांवर अधिक प्रभाव पडत असतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, चाणक्यांच्या नीतिशास्त्रात याविषयी काही स्पष्ट वक्तव्य करण्यात आले आहे. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनासंबंधीच्या अनेक गोष्टींवर अभ्यासपूर्ण आणि शास्त्रसिद्ध पद्धतीने आपले विचार मांडले आहेत. यात महिलांना पुरुषांच्या आकर्षित करणाऱ्या काही गुणांविषयी देखील भाष्य करण्यात आले आहे. चला तर मग पुरुषांमध्ये असे कोणते गुण आहेत जे महिलांना आकर्षित करतात याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
प्रामाणिकता आणि निष्ठा
चाणक्यनीतीनुसार, जे पुरुष आपल्या जोडीदाराबद्दल(partner) प्रामाणिक असतात आणि परस्त्रीकडे कधीही चुकीच्या नजरेने बघत नाही असे पुरुष महिलांच्या पसंतीस उतरतात. असे म्हणतात की, प्रामाणिकता ही कोणत्याही नात्यातील प्रथम पायरी असते. प्रामाणिक पुरुषांवर महिलांचा विश्वास जडतो. यामुळे नातं अधिक घट्ट बनण्यास मदत होते. महिलांना त्यांच्या जोडीदाराने त्यांच्याप्रति एकनिष्ठ राहावं अशी अपेक्षा असते. प्रामाणिकतेमुळे नात्यात स्थिरता निर्माण होते.
शांत आणि सौम्य स्वभावाचे पुरुष
सौम्य स्वभाव कुणाला आवडत नाही, हा अधिकतर महिलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. महिलांना असे पुरुष अधिक आवडतात जे वाद घालत नाहीत, गोष्टी व्यवस्थित हाताळतात आणि त्यांच्या भावनांना समजून घेतात. अशा व्यक्तींमुळे महिलांना सुरक्षततेची भावना निर्माण होते. चाणक्यनीतीत सांगितले आहे की, शांत आणि समतोल विचारसरणी असलेल्या पुरुषांमध्ये महिलांना स्थैर्य दिसून येते, जे कोणत्याही नात्याचा आधार असतो.
व्यक्तिमत्त्वावर आकर्षण
अधिकतर महिला या पुरुषांच्या रूपाहून अधिक त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर घायाळ होत असतात. पुरुषांचं वागणं, बोलणं, त्यांचे विचार आणि स्वभावाकडे अधिक आकर्षित होतात. व्यक्तीचे फक्त चांगले दिसणेच नव्हे तर त्याचा समजूतदारपणा आणि जबाबदारी घेण्याची सवय देखील त्याच्या रूपात आकर्षण वाढवत असते. व्यक्तिमत्त्वातून पुरुषांची नीतिमूल्ये आणि त्यांची विचारसरणी दिसून येते जी महिलांसाठी अधिक महत्त्वाची ठरते.
कर्तव्यदक्ष आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व
जो पुरुष आपले कर्तव्य ओळखून त्याबाबत जबाबदार राहतो अशा व्यक्तींकडे महिला मुख्यत्वे आकर्षित होतात. कर्तृत्ववान पुरुष नेहमीच महिलांसाठी आकर्षणाचे एक मूळ कारण बनते. अशा पुरुषांना महिलांकडून अधिक आदर दिला जातो. आपले काम जबाबदारीने करणाऱ्या पुरुषांकडे महिलांना स्थिरतेची भावना निर्माण होते. चाणक्याच्या नीतिशास्त्रानुसार, जबाबदारीने आपले काम करणारे व्यक्ती हे महिलांसाठी एक आदर्श जोडीदार ठरतात. चाणक्यनीतीमध्ये सांगण्यात आलेले हे गुण अंगिकारल्यास आपल्या जोडीदारासोबतचे आपले नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळते.
हेही वाचा :
200 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन्स, 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जिनपिंग यांना आमंत्रण; PM नरेंद्र मोदींना का नाही?
शॉपिंगसाठी तयार आहात ना? या दिवशी सुरू होतोय Flipkart चा Republic Day स्पेशल सेल!