चतुर्थी स्पेशल! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा उपवासाचे कुरकुरीत थालीपीठ

चतुर्थी किंवा कोणताही उपवास असो, सकाळच्या नाश्त्याला (crispy)काय बनवावं हा विचार नेहमीच डोक्यात असतो. अशा वेळी एक झटपट, स्वादिष्ट आणि पोटभर पर्याय हवा असतो. यासाठी कुरकुरीत उपवास थालीपीठ हा एकदम योग्य पर्याय आहे. घरच्या घरी थोड्याशा साहित्याने बनवता येणारं हे थालीपीठ खवय्यांची मनं जिंकणारा पदार्थ आहे!

साहित्य
साबुदाणा : २ कप
उकडलेला बटाटा : १
कोथींबीर
हिरवी मिरची
जिरे : ½ टीस्पून
मीठ : (crispy)चवीनुसार
लिंबाचा रस : ½ टीस्पून
राजगिराचा पीठ : ३ चमचे
शेंगदाण्याचं कूट : ३ चमचे
लाल तिखट : १ चमचा
तूप किंवा शेंगदाणा तेल: थालीपीठ भाजण्यासाठी

कृती
एका भाड्यात बिजलेला साबुदाणा घ्या. (crispy)त्यात एक उकडलेला बटाटा आणि दीड किसलेला बटाटा टाका. त्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, राजगिरा पीठ, शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. आता एक सुती कापड घ्या आणि त्यावर थालीपीठ थापून घ्या. गरम तव्यावर तूप घालून थालीपीठ दोन्ही बाजूंनी कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. हे थालीपीठ दही, साजूक तूप किंवा नारळाच्या चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करा

हेही वाचा :

मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश!

पाकिस्ताननंतर चीनची नवी कुरापत, अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलली

भाजप नेत्याचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल