महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात(political updates) अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या. कोणत्या क्षणी काहीही होऊ शकते, अशी शक्यता आजही वर्तवली जात असते. गेल्या वर्षी झालेली लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीतही सतत नवीन बदल दिसून येत आहेत. कोणता पक्ष कोणासोबत आणि कधी जाऊ शकतो हे सांगणे खूप कठीण आहे. अशातच आता मुंबईत महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, अशी मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आगामी मुंबई महापालिकेसह, राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा विचार करत आहे. काँग्रेस हे पाऊल उचलणार का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

खरंतर, शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(political updates) हे राज ठाकरेंच्या मनसेसोबत युतीचे संकेत सतत देत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकतेनंतर काँग्रेस आता सतर्क झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आगामी बीएमसी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत मुंबईत महाविकास आघाडी तुटू शकते असे मानले जात आहे.

या संदर्भात, मुंबई महानगरपालिका निवडणूक एकट्याने लढवण्याबाबत मुंबई काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांकडून अभिप्राय घेण्यात आला आहे. ठाकरेंसोबत युती करून निवडणूक लढवल्यास पक्षाचे मोठे नुकसान होईल, असे बहुतेक नेत्यांचे मत आहे. मुंबईत पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी, त्यांनी जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवली पाहिजे. मुंबई काँग्रेस कदाचित ७ जुलैपर्यंत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २९ महानगरपालिका, २४८ नगरपरिषदा, ४२ नगर पंचायती, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्या यांचा समावेश आहे. यापैकी बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीच्या २२७ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्यापक असल्याने त्यांना महाराष्ट्राच्या ‘मिनी विधानसभा’ निवडणुका देखील म्हटले जाते.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला महाविकास आघाडीतील ठाकरे गट (political updates)आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडून स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस वरिष्ठ नेतृत्त्वासोबत चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष लवकरच यावर निर्णय घेणार असल्याचे दिसून येत आहे. जानेवारीमध्ये, शिवसेनेने (यूबीटी) नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला होतील.

सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीला पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, राज्यसभा सदस्य आणि सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी राज्य युनिट प्रमुख नाना पटोले आणि राज्यसभा सदस्य रजनी पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. बैठकीत उपस्थित असलेल्या सुत्रांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला यांदर्भात माहिती दिली. काँग्रेसने बीएमसी निवडणूक स्वबळावर लढावी. तरीही “आम्ही एकटे निवडणूक लढवणे पक्षासाठी चांगले राहील, असा आम्ही निर्णय घेतला आहे. पण युतीबाबत अंतिम निर्णय हायकमांड घेईल.यासंदर्भात येत्या ७ जुलै रोजी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

जर काँग्रेसने महाविकास आघाडीने (MVA)एकत्रितपणे महापालिका निवडणुका लढवल्या तर मुंबईत पक्षाची ताकद आणखी कमी होईल. २००७ च्या बीएमसी निवडणुकीत पक्षाने ७५ जागा जिंकल्या होत्या, २०१२ मध्ये ५६ आणि २०१७ मध्ये गेल्या निवडणुकीत ३१ जागा जिंकल्या होत्या. पण बीएमसी निवडणूक स्वबळावर लढवल्यासपक्षाला संघटना आणि नेतृत्व तयार करण्यास मदत होते. आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत आणि मुंबईत आपली जमीन गमावणे परवडणारे नाही,” असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

नोव्हेंबरपर्यंत शनिच्या वक्रिय गतीमुळे ‘या’ राशींना होणार फायदा

डॅशिंग IPS ऑफिसर अंजली विश्वकर्मा! ४८ लाखांची नोकरी सोडली, दुसऱ्याच प्रयत्नात क्रॅक केली UPS

बिझनेसमधील समस्या पटकन सुटतील, बुधवारी हे उपाय करा, गणपती बाप्पा देईल आशीर्वाद