आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कामाचा ताण, अपुरी झोप, अनियमित आहार आणि बदलते हवामान यामुळे शरीरावर परिणाम होतो. (health) अशाच समस्यांपैकी वारंवार चक्कर येणे ही एक सामान्य वाटणारी, पण गंभीर कारणांशी संबंधित असू शकणारी समस्या आहे. अनेकदा लोक थकवा किंवा तणावामुळे चक्कर येत असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, वारंवार चक्कर येणे हे शरीरात काही महत्त्वाच्या जीवनसत्त्वांची कमतरता किंवा इतर आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी12, फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन बी9 आणि व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेमुळे चक्कर येण्याची शक्यता वाढते. व्हिटॅमिन बी12 आणि फोलेट हे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. या जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यास ॲनिमिया होऊ शकतो. त्यामुळे शरीराच्या विविध भागांसह मेंदूलाही पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी चक्कर येणे, सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा आणि एकाग्रतेचा अभाव यांसारखी लक्षणे दिसू शकतात. (health) त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास स्नायू कमकुवत होणे, शरीराचा तोल जाणे आणि अस्थिर वाटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.मात्र, चक्कर येण्यामागे केवळ जीवनसत्त्वांची कमतरताच कारणीभूत असते असे नाही. कमी रक्तदाब, शरीरातील पाण्याची कमतरता, रक्ताल्पता, कानाशी संबंधित काही विकार, मधुमेह, काही औषधांचे दुष्परिणाम किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळेही ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे वारंवार चक्कर येत असल्यास त्याकडे हलक्यात घेणे योग्य नाही.
जर चक्कर येण्यासोबत सतत थकवा जाणवत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, दृष्टी अंधुक होत असेल, हात-पायांना मुंग्या येत असतील, चालताना तोल जात असेल किंवा तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, बोलण्यात अडचण येणे किंवा बेशुद्ध पडण्यासारखी लक्षणे दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (health) अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.तज्ज्ञांच्या मते, वारंवार चक्कर येत असल्यास स्वतःहून व्हिटॅमिन सप्लिमेंट्स किंवा औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक रक्त तपासण्या करून घ्याव्यात. तपासणीनंतरच योग्य उपचार आणि पूरक आहाराचा सल्ला घेतल्यास समस्येचे मूळ कारण शोधणे सोपे जाते. याशिवाय संतुलित आहार, पुरेसे पाणी पिणे, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या सवयी अंगीकारल्यास अशा अनेक आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?