धावत्या बाईकवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स; VIDEO viral

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक पण तितकाच संतापजनक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.(bike)या व्हिडीओमध्ये एका धावत्या बाईकवर बसलेलं कपल एकमेकांमध्ये इतकं गुंतलेलं दिसतं की, ते रस्त्यावरील इतरांची आणि स्वतःच्या सुरक्षेचीही पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अनेकांनी या कृत्याची टोकाची निंदा केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, एका तरुण रात्रीच्या वेळेस हायवेवर बाईक चालवत असतो आणि बाईकच्या पेट्रोलच्या टाकीवर एक तरुणी झोपलेली आहे. दोघंही अगदी प्रेमात गुंग असल्यासारखे वागताना दिसतात. परंतु ही कृती केवळ सार्वजनिक जागेत गैरवर्तन आहे असं नाही, तर अत्यंत धोकादायकही आहे. दोघांचा हा संतापजनक प्रकार त्याच रोडवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे. (bike)रस्त्यावर वर्दळ असताना अशा प्रकारे निष्काळजीपणाने बाईक चालवणं हा इतरांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे.

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगितले जात असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने कमेंट केली,”थोडं तरी शहाणपण ठेवा”. तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”प्रेम करा, पण अक्कलही वापरा”,तिसऱ्या यूजरने म्हटलं,” हे प्रेम नाही, हा मूर्खपणा आहे” (bike)अशा कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. काहींनी तर थेट पोलिसांना टॅग करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अलीकडच्या काळात धावत्या गाडीवर स्टंट, रोमान्स किंवा मोबाईल वापरणं यासारख्या घटनांची संख्या वाढत आहे. काही व्हिडीओज तर असं सूचित करतात की, हे ठरवून शूट करण्यात आलेले असतात, म्हणजेच केवळ व्ह्यूजसाठी इतरांचा जीव धोक्यात घालणं हे उद्दिष्ट असतं. हे अत्यंत चिंताजनक आहे.

हेही वाचा :

सिंधू पाणी करार : पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका!

राज-उद्धव एकत्र… शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा! 

बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन! रुग्णालयाबाहेरील Video समोर