आज मुंबई शहर आणि त्याच्या आसपासच्या उपनगरीय भागांमध्ये अचानक (surrounding)आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. वेगवान वारे आणि अचानक पडलेल्या या पावसामुळे मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यातच आता हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांमध्ये आणखी जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरे तसेच ठाणे , पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर इतका असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या या इशाऱ्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर अनावश्यक प्रवास टाळावा. तसेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. (surrounding)ज्या प्रवाशांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर जावे लागणार आहे, त्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार तयारी करावी. रेल्वे प्रशासन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असले तरी, प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे प्रशासनाने सूचित केले आहे रायगड जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
जोरदार विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे वाऱ्याची गतीही खूप जास्त आहे. नागोठणे रोहा , पाली या भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आणि वारे वाहत आहेत. कल्याण-डोंबिवलीत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कल्याण पूर्वेकडील रचना पार्क परिसरात एक मोठे झाड कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (surrounding)परंतु, कल्याण पूर्व चिंचपाडा रोड परिसरात एक झाड थेट एका रिक्षावर पडल्याने दोन वृद्ध प्रवासी आत अडकले होते. अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दहिसर पूर्वेकडील दलवी कंपाऊंड , बलिराम इंडस्ट्रीसमोर एस. व्ही. रोडवर जोरदार वाऱ्यामुळे एक झाड कोसळल्याने वाहतूक आणि परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा :
“हम पीछे हटने को तैयार हैं…”, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरला
आज ‘या’ 3 राशींवर असणार बुधादित्य योगाची कृपा; सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
हसत-खेळत वजन होईल कमी, डाएटचीही गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा