चित्रपटाच्या सेटवर कैद झाला LIVE मृत्यू; कार पलटी होऊन प्रसिद्ध स्टंटमन ठार

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या भीषण कार अपघातात प्रसिद्ध स्टंट कलाकार एसएम राजू यांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये पा रंजीत दिग्दर्शित तमिळ स्टार आर्यच्या आगामी ‘वेट्टुवन’ या चित्रपटातील एका धोकादायक कार टपलिंग सीनच्या शूटदरम्यान राजू यांचा मृत्यू झाला. सीन शूट करत असल्याने हा मृत्यू(Death) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडीओत, मृत्यूपूर्वीचा क्षण कैद झाला आहे. यामध्ये राजू अत्यंत वेगाने कार पळवताना दिसत आहे. यानंतर काही क्षणांनी कार पलटी व्हावी यासाठी एका ट्रॅकवर चढते आणि पुढे पलटी होऊन आदळते. यानंतरही सीन शूट होत राहतो. कोणालाही राजू यांचा मृत्यू झाला असावा याची कल्पना नव्हती. मात्क काहाही हालचाल होत नसल्याचं दिसताच सर्वजण धावत सुटतात आणि राजू यांना खेचून बाहेर काढतात. यावेळी त्यांनी राजू यांचा मृत्यू(Death) झाल्याचं लक्षात येतं. यानंतर सेटवरील वातावरण पूर्णपणे बदलतं आणि शोककळा पसरते.

एसएम राजू यांचा दीर्घकाळचा सहकारी आणि मित्र असलेला अभिनेता विशाल याने सर्वात आधी या बातमीला दुजोरा दिला. एक्स वर शेअर केलेल्या श्रद्धांजलीमध्ये, विशालने दुःख व्यक्त केले.

“कार उलटण्याच्या दृश्यात स्टंट कलाकार राजू यांचं निधन(Death) झालं हे पचवणं खूप कठीण आहे,” असं विशालने लिहिलं आहे. “मी राजूला इतक्या वर्षांपासून ओळखतो आणि त्याने माझ्या चित्रपटांमध्ये वारंवार अनेक धोकादायक स्टंट केले आहेत. तो खूप धाडसी माणूस होता. माझी श्रद्धांजली आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो,” असं त्याने लिहिलं आहे.

विशालने राजूच्या शोकाकुल कुटुंबाला आयुष्यभर आधार देण्याचं वचनही दिलं आहे. “देव त्याच्या कुटुंबाला अधिक शक्ती देवो. चित्रपट क्षेत्रातील असल्याने आणि अनेक चित्रपटांमधील त्याच्या योगदानासाठी मी त्याच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी नक्कीच तिथे असेन,” असं आश्वासनही त्याने दिलं आहे.प्रसिद्ध स्टंट कोरिओग्राफर स्टंट सिल्वा यांनीही इंस्टाग्रामवर शोक व्यक्त केला आहे. एका प्रतिभावान सहकाऱ्याच्या निधनाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. “आमच्या महान कार जंपिंग स्टंट कलाकारांपैकी एक, एसएम राजू यांचे आज कार स्टंट करताना निधन (Death)झाले. आमचे स्टंट युनियन आणि भारतीय चित्रपट उद्योगाला त्यांची उणीव भासवेल,” असं त्यांनी लिहिलं आहे.

एसएम राजू हे तमिळ चित्रपट उद्योगातील एक अनुभवी कलाकार होते, जे असंख्य चित्रपटांमध्ये त्यांच्या धाडसी आणि अचूक अॅक्शन सीक्वेन्ससाठी प्रसिद्ध होते. आतापर्यंत, अभिनेता आर्य किंवा दिग्दर्शक पा रंजीत यांनी या घटनेबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलेलं नाही. वेट्टुवन हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे ज्यामध्ये शोभिता धुलिपाला, अट्टाकाठी दिनेश, कलैयारसन आणि लिंगेश यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

फडणवीसांकडून थेट सभागृहात जयंत पाटलांना भाजपा प्रवेशाची ऑफर?

‘या’ लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण माहिती

क्रूरतेची मर्यादा ओलांडली! आधी बेदम मारहाण अन् नंतर मृतदेहावर नाचले लोक VIDEO VIRAL