प्रसिद्ध टीव्ही कपल दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम (serious)सध्या एका मोठ्या चिंतेत आहेत. शोएबने आपल्या ब्लॉगद्वारे चाहत्यांना माहिती दिली आहे की, दीपिकाच्या लिव्हरच्या लेफ्ट लोबमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आढळला आहे. या व्हिडीओमध्ये शोएब खूप बेबस दिसत होता. त्याने सांगितले की दीपिकाची सर्जरी करावी लागणार आहे. डॉक्टरांना अजून कॅन्सरचा कोणताही संकेत मिळालेला नाही, पण त्याची खात्री करण्यासाठी काही टेस्ट बाकी आहेत. एका महत्त्वाच्या ब्लड टेस्टचा रिपोर्ट येणे अजून बाकी आहे.

दीपिका आणि शोएब सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक लहान-मोठी गोष्ट चाहत्यांना सांगतात. यावेळीही शोएबने दीपिकाच्या तब्येतीबद्दल माहिती देताना सांगितले की, दीपिकाची तब्येत ठीक नाहीये, तिला पोटात त्रास आहे आणि ती बरीच गंभीर आहे. (serious)शोएब त्यावेळी चंदीगडमध्ये होता, तर दीपिका मुंबईत होती आणि तिला पोटात दुखायला लागले.सुरुवातीला दीपिकाला वाटले की ॲसिडिटीमुळे दुखत असेल, पण नंतर तिचं दुखणं खूप वाढलं आणि त्यामुळे तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागलं. डॉक्टरांनी काही ब्लड टेस्ट करायला सांगितले होते आणि त्या रिपोर्टमध्ये दीपिकाच्या पोटात इन्फेक्शन असल्याचे निष्पन्न झाले.

शोएब इब्राहिमने पुढे सांगितले की, त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी त्यांना बोलावले आणि सीटी स्कॅन करायला सांगितले. सीटी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये दीपिकाच्या लिव्हरच्या लेफ्ट लोबमध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाले, जो टेनिस बॉलएवढा मोठा आहे. हे त्यांच्या सगळ्यांसाठी खूप धक्कादायक होते. (serious)रिपोर्ट आल्यानंतर त्यांना फक्त याच गोष्टीची भीती वाटत होती की तो कॅन्सर तर नसेल. मात्र, आतापर्यंतच्या रिपोर्ट्समध्ये असे काहीही आलेले नाही, ज्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. दीपिकाच्या अजून काही टेस्ट बाकी आहेत.

शोएबने पुढे हे देखील सांगितले की, या क्षणी दीपिका आणि त्याला सर्वात जास्त काळजी त्यांच्या मुलाची आहे. त्यांचा मुलगा अजूनही दीपिकाकडूनच ब्रेस्टफीड करतो आणि त्याने अजून बाहेरचे दूध प्यायलेले नाही. मुलाला दूध पिऊन झोपण्याची सवय आहे किंवा तो दिवसभर थोडं-थोडं ब्रेस्टफीड घेतो. आता दीपिका जेव्हा ॲडमिट होईल, तेव्हा मुलाला कसे सांभाळले जाईल, याच विचाराने दीपिकाही खूप परेशान आहे. त्यांनी आपल्या चाहत्यांना दीपिकासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश!
पाकिस्ताननंतर चीनची नवी कुरापत, अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलली