पन्हाळ्यासारख्या डोंगराळ तालुक्यात पावसाळ्यात पूर, भूस्खलन आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना नवीन नाहीत. (Panhala) अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी शासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारली असली, तरी प्रत्यक्षात मात्र “आपत्ती व्यवस्थापन नाही थाऱ्यावर, अन जनता वाऱ्यावर” अशीच स्थिती पन्हाळ्यात पाहायला मिळत आहे. शुक्रवारी पहाटे वाघबीळ-पन्हाळा रस्त्यावर वडाचे मोठे झाड कोसळल्याने मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला. मात्र, नेहमीप्रमाणे मुख्य यंत्रणा गायब असताना केवळ पन्हाळा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी पन्हाळा परिसरात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. (Panhala) यामुळे पहाटे अडीचच्या सुमारास बांबरवाडी गावानजीक वडाचे महाकाय झाड रस्त्यावर उन्मळून पडले. अमरावतीचे काही पर्यटक परतत असतानाच ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेले पन्हाळा पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने वाहनधारकांना पर्यायी मार्गाने मार्गस्थ केले.
विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन ‘नॉट रिचेबल’ येत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता देखभाल ठेकेदार असतानाही सकाळपर्यंत झाड बाजूला करण्यासाठी यंत्रणा न पोहोचल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पन्हाळा व बादेवाडीवरून सुटणाऱ्या एसटीच्या पहिल्या फेऱ्या अडकल्यामुळे महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि कोल्हापूर सह अन्यत्र कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे मोठे नुकसान झाले. अखेर सकाळी सव्वाआठ वाजता बांधकाम विभागाची यंत्रणा जागृत झाली आणि झाड हटवण्यास सुरुवात झाली.
पर्यायी मार्गांचे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी वाघबीळ-पन्हाळा मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळणे, झाडे पडणे असे प्रकार वारंवार घडतात. (Panhala) त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनधारकांच्या सोयीसाठी या मार्गावर तात्काळ पर्यायी मार्गांचे दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसात आणि दाट अंधारात पन्हाळा पोलिसांनी रस्त्यावर उतरून केलेले काम कौतुकास्पद ठरले. पोलिसांच्या या तत्परतेचे वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?