मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पार पडले

इचलकरंजी : महाराष्ट्र शासनाच्या मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान (Camp)अंतर्गत १ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या १०० दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेत विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अभियानाचा भाग म्हणून आपत्ती परिस्थितीमध्ये प्रशासनास सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दि. १५ जुलै रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे आयोजित या प्रशिक्षण शिबिरात सुमारे ४०० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. शिबिराचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील (Camp)यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

प्रशिक्षणादरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांनी स्वयंसेवकांना आपत्ती काळातील आवश्यक साहित्य, बचाव कार्य, अन्न व निवारा व्यवस्थापन, आग प्रतिबंधक उपाय, पाण्याची व्यवस्था, प्राथमिक उपचार याविषयी सखोल माहिती दिली. उपस्थित स्वयंसेवकांच्या शंका-समस्यांचे निरसनही करण्यात आले.

या उपक्रमात अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, वाहन (Camp)अधिक्षक प्रशांत आरगे यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि फायर जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषतः शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून शहरातील स्वयंसेवक अधिक सजग, सक्षम आणि आपत्ती काळात तत्पर राहण्यासाठी तयार झाले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा :

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल

मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत ‘नको ते घडलं’; परिसरात खळबळ

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO