महायुतीच्या एकत्रित निवडणूक लढतीवर सोशल मिडियावर चर्चा – भाजपा कार्यकर्त्याची “नको” प्रतिक्रिया चर्चेत

इचलकरंजी (प्रतिनिधी) :
आगामी निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती इचलकरंजीतील एका भारतीय जनता पक्षाच्या राजकीय WhatsApp ग्रुपवर “सूत्र” म्हणून शेअर करण्यात आली. या माहितीवर प्रतिक्रिया देताना, भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याने थेट “नको” असा रिप्लाय दिला, आणि चर्चेला नवा रंग दिला आहे.



विशेष म्हणजे, या कार्यकर्त्याने एका प्रसिद्ध न्यूज पोर्टलची लिंक शेअर करून कोल्हापूर मधील भाजपचे नगरसेवक फोडून शिवसेनेत (शिंदे गट) घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा केला. यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, महायुतीतील एकत्रित लढाईबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

या प्रकारामुळे इचलकरंजीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत नाराजी व मतभेद उफाळून येत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सध्या तरी पक्षाकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

महायुतीच्या जागावाटपापूर्वीच स्थानिक पातळीवरील नाराजी असेच उफाळून आली, तर पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकणे हे मोठं आव्हान ठरू शकतं, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.