आपल्या देशात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ. क्रिके(ticket websites)ट हा धर्म तर क्रिकेटपटूंना देव मानलं जातं. त्यातच देशात सध्या आयपीएल सुरु आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडिअम हाऊसफुल होतायत. सामन्याची तिकिट मिळवण्यासाठी लोकं जास्तीचे पैसे देखील मोजयात.
पण याचा काही लोकांकडून फायदा घेतला जातोय. अशीच एक घटना 43 वर्षांच्या एका महिलेसोबत(ticket websites) घडली आहे. या महिलेला बंगळुरुमध्ये झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहायचा होता. यासाठी ती ऑनलाईन तिकिट मिळतंय का याचा शोध घेत होती.
शोध घेत असतानाच फेसबुकवर या महिलेला ‘IPL Cricket Ticket’ नावाचं एक पेज दिसलं. आयपीएल सामन्याचं तिकिट मिळणार या आनंदात महिलेने त्या पेजवर दिलेल्या नंबरवर फोन केला.
फेसबूक पेजवर दिलेल्या नंबर वर फोन लावल्यानंतर समोरच्या व्यक्तीने आरसीबी वि. केकेआर सामन्याची तिकिटं मिळण्याची हमी दिली. महिलेने 20 तिकिटं हवी असल्याचं त्या व्यक्तीला सांगितलं. यावर त्याने सुरुवातीला काही पैसे भरावे लागतील म्हणजे तिकिटं बूक करुन ठेवता येतील असं सांगितलं. यासाठी सुरुवातीला त्याने महिलेकडे 8000 रुपयांची मागणी केली. महिलेने त्या व्यक्तीवर विश्वास टाकत त्याने दिलेल्या अकाऊंटवर आठ हजार रुपये ट्रान्सफर केले.
पण त्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा 11000 रुपयांची मागणी केली आणि ते पैसे देखील महिलने ट्रान्सफर केले. त्यानंतर पु्न्हा वेगवेगळी कारण देत त्या व्यक्तीने महिलेकडून, 8,170, 14,999 आणि 21,000 हजार रुपये उकळले. आपल्या तिकिटं मिळतील या आशेने महिला सांगेल तितके पैसे ट्रान्सफर करत राहिली.
महिले तिकाटांची मागणी केल्यानंतर त्या व्यक्तीने सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं कारण दिलं. यासाठी 16 हजार रुपयांची गरज असल्याचं सांगत महिलेकडे पैसे मागण्यात आले. पण यावेळी महिलेने पैसे देण्यास इन्कार केला. आपले आधीचे पैसेही महिलेने परत मागितले. पण त्या व्यक्तीने आपला फोन बंद करुन टाकला. आपल्यासोबत धोका झाल्याचं या महिलेला कळल, पण तोपर्यंत महिलेने जवळपास 80 हजाराहून अधिक रुपये गमावले होते. या महिलेने झालेल्या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतला असून याचा तपासही सुरु केला आहे. ऑनलाईन घेवाण-देवाण करताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हेही वाचा :
इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? राहुल गांधींनी दिलं उत्तर
‘रावेर’चा गड खालसा करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ नेत्याला उमेदवारी?
टेस्लाने सुरू केली ‘राइट-हँड ड्राईव्ह’ गाड्यांची निर्मिती; लवकरच भारतात करणार लाँच