‘बंद करायची आहे ना? बंद करुन टाका’; छगन भुजबळ सत्कार कार्यक्रमात संतापले

पुणे जिल्ह्यातील इंदपूरमधील विश्रामगृहात सत्कार समारंभाचा कार्यक्रमत होता. या कार्यक्रमाला(program) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. पण या कार्यक्रमात अनेकदा वीजपुरवठा खंडीत होत होता. यामुळे कार्यक्रमात होत असलेल्या गैरसोयीमुळे उपस्थित सर्वच थोडेसो गोंधळले. यावेळी छगन भुजबळ देखील संतापले आणि ते व्यासपीठावरुन खाली उतरले.

सत्कार स्वीकारताना छगन भुजबळ(program) यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तेथे उपस्थित असलेल्या पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. पुढे भुजबळ म्हणाले की, ‘दहा सेकंद येते 10 सेकंद जाते. बंद करायची आहे ना? मग बंद करून टाका असे म्हणत भुजबळ भडकल्याचे दिसले.

यावर पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांनी सारवासारव केल्याच दिसून आलं. सकाळपासून हा प्रकार सुरु आहे. पण तुम्ही येणार आणि हा सत्कार सोहळा आहे. असं सांगूनही हा प्रकार घडला, असं उत्तर पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्याने दिली. वीज पुरवठा खंडित होत असल्याने बांधकाम विभागाच्या व्यवस्था पाहून मंत्री भुजबळ चांगलेच भडकल्याच दिसून आलं. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

बिग बॉस 19 मध्ये ५ मोठे बदल, सलमान खानसह नवीन ट्विस्ट

टीम इंडियासाठी वाईट बातमी! ऋषभ पंत दुखापतीमुळे एवढ्या महिन्यांसाठी संघातून बाहेर

वयाने लहान मुलांना Date का करत आहेत मुली? रिलेशनशिप सिक्रेटचा खुलासा