उशीलाही असते एक्सपायरी डेट? जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ, अन्यथा…

बहुतेक घरांमध्ये उशी ही झोपेचा अविभाज्य भाग असते.(expiration)आपण दररोज त्यावर डोके ठेवून झोपतो, पण या उशीमुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं, हे तुम्हाला माहिती आहे का? आपण बहुतेक वेळा उशीच्या फक्त कव्हरचीच सफाई करतो, पण खऱ्या धोक्याचं मूळ उशीच्या आत लपलेलं असतं.

उशीला वर्षानुवर्षं वापरल्याने तिच्या आत घाम, थुंकी, केस, मृत त्वचा आणि ओलावा साठत जातो. हे सर्व घटक बुरशी, जीवाणू आणि धूळ यांचं प्रजनन वाढवतात.(expiration) अशा उशीचा दररोज वापर केल्याने चेहऱ्याला अ‍ॅलर्जी, डोकेदुखी, वारंवार सर्दी-खोकला होणे आणि त्वचाविकार होण्याचा धोका वाढतो. विशेषतः ज्यांना सायनस, दम्याचे त्रास आहेत, त्यांच्यासाठी अशा उश्या अधिक धोकादायक ठरू शकतात.

  1. उशीचं मूळ स्वरूप शेप बिघडलेलं वाटत असेल.
  2. उशीवर झोपल्यावर सतत डोके किंवा मानेत वेदना होत असतील.
  3. उशीला फोल्ड केल्यावर ती पूर्ववत होत नसेल.
  4. उशीतील रुई एकाच ठिकाणी गोळा झाल्यास किंवा त्यात गाठी तयार झाल्या असतील.
  5. सकाळी उठल्यावर मानेत किंवा पाठीत जडपणा वाटत असेल.

फक्त कव्हर बदलणं पुरेसं नाही
अनेकांना वाटतं की, उशीचं कव्हर वेळोवेळी बदललं की स्वच्छता झाली. पण वास्तव वेगळं आहे. उशीच्या आतील भागात साचलेली घाण कव्हरने झाकलेली असते, पण ती अदृश्य असली तरी शरीरावर परिणाम करत असते. सतत संपर्कामुळे चेहऱ्यावर पुरळ, खाज, किंवा डोळ्यांच्या भोवती सूज येऊ शकते. त्यामुळे उशीची स्वच्छता आणि वेळेवर बदली करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे.

उशीतून होणाऱ्या आजारांची शक्यता
वारंवार सर्दी, खोकला, थकवा किंवा ताप.
त्वचेवर अ‍ॅलर्जी किंवा पुरळ होणे.
मानेत किंवा पाठीच्या वरच्या भागात वेदना किंवा अकडणे.
नीट झोप न लागणे किंवा झोपमधे खोडणं.
उपाय आणि काळजी

उशीला दर आठवड्याला उन्हात वाळवणं आणि वेळोवेळी कव्हर बदलणं.
शक्य असल्यास वॉशेबल उशा वापरणं.(expiration)उशीला अर्ध फोल्ड करा, ती लगेच मोकळी झाली नाही, तर बदलण्याची गरज आहे.

हेही वाचा :

उद्या शुक्रवारी बंद राहणार सर्व बँका; जाणून घ्या RBI ने 27 जूनला का दिली आहे सुट्टी

NHAI वर दुचाकी वाहनांनाही द्यावा लागणार टोल, १५ जुलैपासून लागू होणार नियम

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका