अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या विधानाने नवी चर्चा सुरु होती. (Commissioner) आता यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया देत चांगलंच सुनावले आहे.

मांसाहार करणाऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बनवलेले मटण खाण्याची इच्छा असते. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागात बनवण्यात येणाऱ्या सावजी मटणाची चवच काही औरच आहे. मांसाहार करणारे हे मटण खाण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जातात. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद पेटला. त्यांनी मी हे मटण खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन असं विधान केले होते. आता त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वक्तव्य केले आहे.
नुकताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी तुकाराम मुंडे यांना चांगलेच सुनावले आहे. “सावजी हे रेस्टॉरंट विदर्भातील तीन चार पिढ्यांपासून सुरू आहे. सावजी ही मसल्याची पद्धती आहे. त्यामुळे प्रत्येकाला सावजी जेवलं पाहिजे अशी लोकप्रियता आहे. हे मसाले तसे आहेत. ते कुणी बनवत नाही. (Commissioner) त्यावर सरसकट टिप्पणी करणं अधिकाऱ्याला योग्य दिसत नाही. जगातील अनेक देशात सावजीची मागणी केली जाते. मला वाटतं की त्या व्यवसायाबद्दल काही बोलू नये. त्यांच्या व्यवसायाला बळीचा बकरा करू नका. घरातील जेवण रेस्टॉरंटमध्ये आणलं जात आहे. मोठा व्यवसाय आहे. व्यवसाय बंद होईल असे आरोप करू नये” असे ते म्हणाले.
तुकाराम मुंढे यांनी अमरावतीत आल्यावर नागपुरी सावजी विषयी विधान केलं होतं. सावजी खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर सावजी (हलबा) समाजाने निषेध नोंदवला आहे. हलबा समाजाने आज रस्त्यावर उतरून तुकाराम मुंढे यांचा निषेध नोंदवला. त्यानंतर तुकाराम मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी अमरावती येथील कार्यक्रमात हे विधान केलं होतं. सावजी खाल्लं तर मी आजारी पडेन असं म्हटलं होतं. हे खरं आहे. पण, इतर कोणी खा किंवा खाऊ नका, असं मी म्हटलेलं नाही, असं तुकाराम मुंडे म्हणाले होते. आपल्या विधानावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांचं हे विधान असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Commissioner) तसेच त्याबाबतचे मिम्सही व्हायरल होत आहेत. तसेच तुकाराम मुंढे यांच्या या व्हिडिओवर अनेक पोस्ट येत आहेत. काही पोस्टमध्ये तर चला सावजी खाऊ असं म्हटलंय. त्यामुळे सोशल मीडियावर सावजी मटण हा ट्रेंड सुरू झाला आहे.
हेही वाचा :
पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?
व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?