कोल्हापुरातील मुख्य चौकात मद्यधुंद तरुणाकडून महिला पोलिसाला दमदाटी

लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर चौकात एका दुचाकीवरून मद्यधुंद अवस्थेत(traffic)जाणाऱ्या तिघा तरुणांना अडविणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला पोलिसाला दमदाटी करण्याचा प्रकार आज सायंकाळी घडला. यातील दोघे जण पसार झाले. तर दमदाटी करणाऱ्या तरुणाची दुचाकी वाहतूक शाखेकडून हस्तगत करण्यात आली. तो सोमवार पेठेतील रहिवासी असून त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान, वादावादीमुळे बघ्यांची गर्दी झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, फोर्ड कॉर्नर चौकात वाहतूक नियंत्रण (traffic)शाखेच्या महिला पोलिस कार्यरत होत्या. सायंकाळी एका दुचाकीवरून तिघे जण मद्यधुंद अवस्थेत वाहतूक नियमाचे उल्लंघन करून जात होते. त्यांना महिला पोलिसांनी अडविले. यावेळी पोलिस आणि दुचाकीस्वार यांच्यात जोरदार वादावादी झाली.

यावेळी दुचाकीवरील अन्य दोघे जण पसार झाले. तर सोमवारपेठ येथील या मद्यधुंद तरुणाने महिला पोलिसांना दमदाटी करून त्यांच्याशी उद्धट वर्तन केले. यावेळी नागरिकांची गर्दी झाली(traffic)काही वेळातच वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ दुचाकी ताब्यात घेतली. यानंतर संबंधित तरुणाविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

चिंतनीय घटना घडल्या दोन; सांगा, त्याला जबाबदार कोण?

पगाराच्या थकबाकीवरून घंटागाड्या ठप्प, कामगारांच्या आंदोलनानंतरच काम सुरू

सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral