दररोज ‘हे’ एक निळं फळ खा, चयापचय वाढण्यासोबतच वजन होईल झपाट्याने कमी

आजकाल बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणा ही अशी एक समस्या बनली आहे(changing ) ज्यामुळे जगभरातील लाेकं वाढत्या वजनाने अनेक आरोग्याच्या समस्यांना बळी पडत आहे. किशोरवयीन मुले आणि तरुणांनाही वाढत्या वजनाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यासाठी प्रत्येकजन वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. त्यासोबतच संतुलित आहार घेणे सर्वात महत्वाचे आहे, अन्यथा तुम्ही व्यायाम करूनही वजन कमी होणे कठीण होते. खरं तर, योग्य अन्न तुमच्या चयापचयाला चालना देते, जे वजन कमी करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जर तुमच्या शरीरातील चयापचय दर मंद असेल तर त्यामुळे थकवा तसेच वजन वाढणे आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

वजन कमी करणे हे अनेकांना कठीण वाटत असले तरी तितके कठीण नाही. एकदा तुम्ही वजन कमी करण्यासाठी उपाय अवलंबता तेव्हा सर्व नियम जाणून घेतले आणि त्यांचे पालन केले की तुम्ही सहजपणे तंदुरुस्त होऊ शकता. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा चयापचय वाढवा. या लेखात आपण अशाच एका सुपरफूडबद्दल जाणून घेऊ ज्याच्या मदतीने तुम्ही किमान 20 टक्के वजन कमी करू शकता.

जेव्हा वजन कमी करण्याचा किंवा वाढण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही पहिला शब्द ऐकला असेल(changing ) तो म्हणजे मेटाबॉलिझम. जर मेटाबॉलिझमचा म्हणजेच चयापचयचा दर मंद असेल तर वजन वाढू लागते. यामागे अनेक कारणे आहेत, वाईट खाण्याच्या सवयींपासून ते ताणतणाव आणि बिघडलेली दिनचर्या. चयापचय ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये खाल्लेल्या अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर होते. ज्यामुळे तुम्ही न थकता रोजची तुमची कामे करू शकता. या प्रक्रियेच्या दराला मेटाबॉलिझम रेट म्हणतात.

वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे जे फायबरचे चांगले स्रोत आहेत. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर विल्यम ली यांनी अलीकडेच एका व्हिडिओद्वारे सांगितले की जर फक्त एक चतुर्थांश इतके ब्लूबेरीचे सेवन केले तर शरीरातील फॅट कमी करता येते. (changing )डॉ. ली सांगतात की ब्लूबेरीमध्ये फायबरसह पॉवरफूल अँटीऑक्सिडंट्स असतात. म्हणूनच हे एक असे फळ आहे जे चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

निरोगी राहण्यासाठ तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता नसणे खूप महत्वाचे आहे. जर फळांना आहाराचा भाग बनवले तर शरीराला सूक्ष्म पोषक तत्वांची पूर्तता होते. ब्लूबेरीचे सेवन केवळ वजन कमी करण्यासाठीच उपयुक्त नाही तर ते तुमच्या एकूण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्वचा निरोगी ठेवणे, हृदयाचे आरोग्य राखणे, पचन सुधारणे, हिमोग्लोबिन उत्पादन सुधारणे इत्यादी अनेक फायदे आहेत.

हेही वाचा :