पुर्वीचे ट्विटर आणि आताचे एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचे मालक एलन मस्क(Elon Musk ) यांची आता भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये एन्ट्री झाली आहे. कारण आता एलन मस्कच्या स्टारलिंक सॅटकॉम सेवेला भारतात परवानगी देण्यात आली आहे. या कंपनीकडून ग्राहकांना जलद इंटरनेट सुविधा पुरविण्यात येणार आहे.
त्यामुळे आता स्टारलिंक ही भारतात टेलिकॉम सेक्टरमध्ये एन्ट्री(Elon Musk )करणारी कंपनी ठरली आहे. या अगोदर एअरटेलची युटेल सॅट वनवेब आणि रिलायन्स जीओला परवानगी देण्यात आली होती. संचार मंत्री ज्योतिरादित्या सिंधिया यांनी याबाबत घोषणा केली आहे. या परवान्यानंचर स्पेक्ट्रम वाटप केलं जाईल. ज्यामुळे सॅटेलाईट टेलीकॉम सेवा जलद गतीने सुरू होतील. ही सेवा विशेषत: त्या भागांना दिली जाणार आहे. जेथे वायरच्या सहाय्याने इंटरनेट पोहचू शकलेलं नाही.
या परवानगी नंतर लवकरच स्टारलिंकची सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. इंटरनेटच्या प्रवासामध्ये सुरवातीला फिक्स्ड लाईन कनेक्शन असायचे, त्यानंतर मोबाईल नेटवर्क आलं, त्यानंतर ब्रॉडबॅन्ड आणि आता ऑप्टिकल फायबर देखील आलं आहे. आता मात्र त्याही पुढे थेट सॅटेलाईट कन्क्टीव्हिटी आली आहे. ज्याची अत्यंत गरज आहे. कारण देशाच्या आदीवासी आणि दुर्गम भागात ब्रॉडबॅन्ड किंवा ऑप्टिकल फायबर लावणं अत्यंत कठीण होतं. मात्र आता सॅटेलाईटच्या मदतीने डोंगराळ भागात देखील चांगली इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
मिडीया रिपोर्ट्सनुसार भारतात स्टारलिंकचे प्लान हे प्रमोशनल ऑफर्ससह असतील ज्यामध्ये 10 डॉलर म्हणजे 840 रूपये ही सुरूवातीची किंमत असणार आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड डेटा असणार आहे. ग्राहकांना हे प्लान्स कितपत भावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जरी या इंटरनेट सुविधेचे प्लान स्वस्त असले तरी त्यासाठी लागणारी यंत्रणा ही महागडी आहे. त्यामुळे ग्राहक नाराज होऊ शकतात. दुसरीकडे भारतात सध्या असलेल्या कंपन्यांमध्येच प्राईस वॉर सुरू आहे.
हेही वाचा :