प्राजक्तासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्याचे नको ते धाडस, Video व्हायरल

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे सोशल मीडियावर(social media) प्रचंड चर्चेत असते. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये असो किंवा चित्रपट. प्राजक्ता माळी तिच्या हटके स्टाईल आणि वेगवेगळ्या विनोदी डायलॉगमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

नुकतीच ती एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचली होती. यावेळी तिच्या सोबत असं काही घडलं ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच सोशल मीडियावर(social media) प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये तिच्या चाहत्याने चक्क प्राजक्ता माळीसोबत सेल्फी घेण्यासाठी लिफ्टच थांबवून ठेवली.

सध्या ‘ये रे ये रे पैसा 3’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. संजय जाधव दिग्दर्शित असणारा हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे. अशातच या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला अनेक मराठी कलाकार देखील हजेरी लावत आहेत. प्राजक्ता माळीने देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती.

प्राजक्ता माळी नुकतीच ‘ये रे ये रे पैसा 3’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचली होती. यावेळी तिने खास वनपीस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. पापाराझींना थिएटरबाहेर पोज दिल्यानंतर प्राजक्ता लिफ्टमधून स्क्रीनिंगसाठी निघाली असता चाहत्याने तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चक्क लिफ्ट थांबवून ठेवली. अनेकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण चाहत्याने सेल्फीचा हट्ट धरला. तो लिफ्टमध्ये घुसला. त्याला प्राजक्ता माळीसोबत फोटो हवाच होता.

दरम्यान, अशातच प्राजक्ता माळीने लिफ्टचं बटन दाबलं मात्र, चाहत्याने दरवाजा बंद होण्याआधीच तो अडवला. त्याठिकाणी असणाऱ्या व्यक्तीला तो सेल्फी घेण्यासाठी सांगत होता. हे सर्व पाहून प्राजक्ता दरवाजा बंद होऊ नये यासाठी पुढे आली. चाहत्याने सेल्फी काढल्यानंतर प्राजक्ता माळी लिफ्टने गेली. सध्या याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनय आणि सौंदर्याने प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा चाहत्यासोबतचा व्हायरल व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी त्या फॅनची खिल्ली देखील उडवली आहे. तर दुसरीकडे खास गोष्ट म्हणजे प्राजक्ताचं कौतुक देखील केलं जात आहे. अनेकदा कलाकार चाहत्यांसोबत सेल्फी घेताना विचित्र वागणूक देतात. पण प्राजक्ता माळीचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा :

नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ, श्रावणातील पारंपरिक रेसिपी

मुंबईहून गोवा अवघ्या १२ तासांत पोहचा.., भारतात पहिल्यांदाच सुरु होणार फेरी सेवा

नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे