आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण शॉर्टसर्किटमुळे घराला आग दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू?

रात्री गणरायाची पूजा झाली, घरात आनंदाचे वातावरण होते, कुटुंबातील सदस्यांनी एकत्र जेवण केले आणि दिवसभराच्या धावपळीनंतर प्रत्येक जण झोपी गेला. मात्र,(family members) काही तासांतच या कुटुंबावर काळाने घाला घातला. घरात शॉर्टसर्किट होऊन अचानक लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत दमोने कुटुंबातील चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर गजानन दमोने आणि त्यांचा मुलगा रोशन हे गंभीर जखमी झाले. या घटनेने ढोर गल्ली (चव्हाट गल्लीची मागील बाजू) अक्षरशः हादरून गेली.

ढोर गल्लीत तीन भावांची घरे एकाच रांगेत आहेत. एक भाऊ बाहेरगावी गेला होता, तर इतर कुटुंबीय घरात होते. मागील बाजूस असलेल्या गजानन दमोने यांच्या घरात आग लागली. सुरुवातीला लागलेली आग काही क्षणांतच वाढली आणि घरातील संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले. गजानन दमोने हे मेकॅनिकल काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. (family members) त्यांचा मुलगा रोशन उद्यमबाग येथील एका कंपनीत कामाला होता. प्रिया दमोने आणि गंगा दमोने या न्यायालयाच्या आवारातील झेरॉक्स दुकानात नोकरी करीत होत्या. शारदा दमोने या घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्याबरोबरच इतर कामे करीत होत्या. तर आत्या भारती दमोने याच घरात टेलरिंगचे काम करीत होत्या.

घरातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने काम करून संसाराचा गाडा पुढे नेत होती. कष्ट, नोकरी आणि छोट्या-मोठ्या कामांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा खर्च भागत होता. परिसरातील नागरिकांशी आपुलकीने वागणारे हे कुटुंब म्हणून त्यांची गल्लीत ओळख होती. त्यामुळे अचानक घडलेल्या या दुर्घटनेने परिसरातील नागरिकांवरही दुःखाचा डोंगर कोसळला. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने शेजारील घराचेही मोठे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी नागरिकांनी धावपळ केली. दरम्यान, दमोने कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच ढोर गल्लीवर शोककळा पसरली.

ढोर गल्ली परिसरातील दुमाने कुटुंबावर काळाने घाला घातला. या घटनेनंतर घरातील फ्रिजच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होऊन आग मोठ्या प्रमाणात भडकल्याची चर्चा परिसरात दिवसभर सुरू होती. मात्र, फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा प्रत्यक्ष स्फोट होण्याची शक्यता कितपत आहे, याबाबत शहरातील फ्रिज विक्रेत्यांकडून माहिती घेतली असता फ्रीजमधील कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होऊ शकत नाही, असे म्हणणे आहे. शहरातील फ्रिज विक्रेत्यांच्या माहितीनुसार फ्रिजच्या कॉम्प्रेसरमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. मात्र, कॉम्प्रेसरचा स्फोट होण्याची शक्यता अतिशय कमी असून, विद्युत सर्किटमध्ये शॉर्टसर्किट होणे, वायरिंगमध्ये बिघाड होणे अथवा अतिउष्णता निर्माण होणे यामुळे फ्रिजमध्ये आग लागण्याची शक्यता असते.

मात्र, फ्रिजमध्ये विविध प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था असल्याने कॉम्प्रेसरचा थेट स्फोट होण्याची घटना सहसा घडत नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले. कॉम्प्रेसरमध्ये रेफ्रिजरंट गॅस असतो; मात्र त्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. (family members) त्यामुळे केवळ कॉम्प्रेसरमधील गॅसमुळे मोठा स्फोट होणे ही सामान्य घटना नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, विद्युत बिघाड, अतिउष्णता किंवा इतर कारणांमुळे आग लागल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. ढोर गल्लीतील दुर्घटनेत नेमके कारण काय होते, हा अद्याप तपासाचा विषय असून, तपासानंतरच सत्यता समजू शकणार आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?

 नांदणीत ‘माधुरी’ला पाहण्यासाठी गर्दी कायम?