मोठी बातमी समोर येत आहे, 40 विद्यार्थी घेऊन निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस बारामतीच्या सुपे घाटात उलटी आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, 40 विद्यार्थी घेऊन निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस बारामतीच्या सुपे घाटात उलटली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. पाटसवरून सकाळी सातच्या सुमारास ही बस सुटते. त्यानंतर ही बस पुढे कुसेगाव, पडवी, गायकवाड मळा, पुढे सुपे घाटातून ही बस विद्यार्थी घेऊन विद्याप्रतिष्ठाणच्या संकुलात जात असते. मात्र या बसला सुपे घाटात अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. (accident) दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून फोनवरून या अपघाताची माहिती घेण्यात आली आहे, तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत या अपघाताबद्दल माहिती दिली आहे. तसेच त्यांनी या अपघातानंतर एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं आहे. ‘ विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची ST बस सुपे घाटात कोसळल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि एसटी महामंडळाच्या सेवेबाबत चिंता वाटावी अशी आहे. (accident) काही विद्यार्थ्यांना लागलेला थोडा-मार वगळता नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याच्या जिवीतास धोका झाला नाही, हे सर्वजण सुखरुप आहेत. पण गेल्या आठवड्यातही स्वारगेटहून बारामतीला जाणाऱ्या सलग दोन बस बंद पंडल्याने प्रवाशांना तिसऱ्या बसमध्ये बसवून द्यावं लागलं आणि त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यापूर्वीच्या परिवहन आयुक्तांचा कार्यकाळ स्वच्छ कारभाराऐवजी काळाबाजार करण्यातच गेल्यामुळं एसटी महामंडळावर वारंवार ही वेळ येत असल्याचं दिसतंय. प्रशासनाने तातडीने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि विद्यार्थीच काय एसटीने प्रवास करणाऱ्या कोणत्याही सामान्य माणसाचा जीव धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी..!’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. सुनेत्रा पवार यांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक (accident) तसेच डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संवाद साधत जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार व योग्य आरोग्यसेवा मिळावी, याबाबत त्यांनी डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?