मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. (Mumbai) त्यांनी मंगळवारी मुंबईकडे प्रस्थान केलं आहे. आज त्यांचा मुक्काम श्रीगोंदा इथे असणार आहे. मात्र त्यापूर्वीच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. त्यांनी 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. बारा सप्टेंबरला त्यांनी आपल्या मुंबई दौऱ्याची तारीख घोषीत केली, त्यानुसार त्यांनी 15 सप्टेंबर रोजी अतंरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केलं आहे. मंगळवारी त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता. दरम्यान त्यानंतर आज त्यांचा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथे असणार आहे. (Mumbai) मात्र त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या नियोजित दौऱ्यात बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटोद्यात हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील आता खोपोली मार्गे थेट मुंबईला जाण्याची शक्यता आहे. पाटोद्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून जरांगे पाटील यांच्याची चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकृती खालावल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांसह वैद्यकीय पथकाकडून उपचार करण्यासाठी आणि तपासणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. (Mumbai) मात्र उपचार आणि तपासणीस जरांगे पाटलांनी नकार दिला आहे. अद्याप जरांगे पाटील बाहेर आले नसून, त्यांनी कोणाचीही भेट घेतलेली नाही.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?