बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला असून, दोन्ही पवार गटांनी आपली ताकद पणाला लावली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्याची निवडणूक राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. (political) त्यामुळे कारखान्याची निवडणूक आता तिरंगी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ मैदानात असून, या पॅनलची जबाबदारी युगेंद्र पवार यांच्यावर आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “आपल्या सर्वांचे संबंध चांगले आहेत. नंतर कोण जवळ येणार, अशा अनेक अफवा आहेत. कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका. एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते, दादांसारखी मी नाही,” अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी इशारा दिला.
याचबरोबर कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. कारखान्याचा अध्यक्ष सर्वसमावेशक असेल आणि सर्वांच्या मर्जीनुसार अध्यक्षाची निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदासाठी आधीच कोणाचे नाव निश्चित केलेले नसून निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्ष कोण होणार हे ठरवले जाईल, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या हस्ते बारामतीमध्ये श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’चा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. (political) यावेळी जय पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेवर भाष्य करत कारवाईचा इशारा दिला.
जय पवार म्हणाले की, यापूर्वी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी कारवाई होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, अजित पवार यांचे नाव आणि फोटो वापरू नये, एवढीच सूचना करण्यात आली होती. आता सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ वापरून त्यांच्या पॅनलचा प्रचार केला जात असल्याने पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे जय पवार यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांच्या आवाजाचा वापर करून व्हिडिओ तयार करण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
एकीकडे अजित पवार गटाकडून निवडणुकीत ताकद लावली जात असताना दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे पॅनल मैदानात उतरले आहे. त्यातच पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने सोमेश्वर कारखान्याची निवडणूक चुरशीची बनली आहे. (political) त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे केवळ कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचेच नव्हे, तर बारामतीच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
राज्यातील साखर कामगार २२ ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर कोल्हापुरात इशारा मोर्चावेळी घोषणा
MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले
सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यूEdit