येथील बापट मळ्याजवळील मल्हार रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ८,७५,७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. (Apartment) याप्रकरणी शीतलकुमार सुरेंद्र पाटील (वय ४५, रा. फ्लॅट नं. ३, मल्हार रेसिडेन्सी, बापट मळा) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी नोकरीत असलेले शीतलकुमार पाटील हे २४ जून रोजी सकाळी ९ वाजता आपल्या घराला कुलूप लावून नोकरीनिमित्त बाहेर गेले होते. (Apartment) यादरम्यान चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या समोरील दाराचा कडीकोयंडा कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून आतील ५० ग्रॅमचे सोन्याचे गंठण, १५ ग्रॅमचे मणीमंगळसूत्र, सोन्याच्या पाटल्या, अंगठ्या, चांदीचे विविध दागिने आणि कपाटात ठेवलेली २०,००० रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पाटील हे सायंकाळी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती दिली असता, विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
चोरटे मुद्देमाल घेऊन दहा मिनिटांत पसार चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. (Apartment) यामध्ये दुपारी तीनच्या सुमारास दोन संशयित चोरटे अपार्टमेंटमध्ये शिरल्याचे दिसत आहे. चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत घरातील कपाट उचकटून सर्व मुद्देमाल लंपास केल्याचे फुटेजवरून उघड झाले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा माग काढत आहेत.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?