जयसिंगपूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मर्चंट असोसिएशन परिसरात शुक्रवारी (दि.१०) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका तरुणावर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाल्याची (Jaysingpur) धक्कादायक घटना घडली.

दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रदीप तलवार (रा. नांदणी रोड, जयसिंगपूर) या तरुणावर लोखंडी ‘येडक्याने’ (धारदार हत्यार) सपासप वार केले. या हल्ल्यात प्रदीप गंभीर जखमी झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप तलवार हा मर्चंट असोसिएशन परिसरातून जात असताना अचानक दोन तरुण तिथे आले. त्यांनी प्रदीपला गाठले आणि (Jaysingpur) काही समजण्याच्या आत त्यांच्याकडील लोखंडी येडक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे आसपासच्या नागरिकांची एकच पळापळ झाली. या घटनेनंतर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
नागरिकांनी तात्काळ याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळावरून रक्ताने माखलेला लोखंडी येडका आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रदीपला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Jaysingpur) वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे आसपासच्या नागरिकांची एकच पळापळ झाली. या घटनेनंतर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. जयसिंगपूर पोलीस फरार हल्लेखोरांचा शोध घेत असून, या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हेही वाचा :
कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?
क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?