आवाडे जवाहर साखर कारखान्यात ६०० कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी अमित शहा रविवारी कोल्हापुरात??

देशातील अग्रेसर सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकारी तत्वावर आधारित शून्य कचरा संकल्पनेतून शेती उत्पादनासाठीचा ६०० काेटी रुपये गुंतवणूकीचा बहुराज्य सहकार तत्वावरील प्रकल्प कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी सुरु करण्यात येणार आहे. (Kolhapur) या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ रविवारी (२० सप्टेंबर ) सकाळी ११ वाजता केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हाेणार आहे, अशी माहिती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

सध्याची साखर उद्याेगसमाेरील आव्हाने लक्षात घेता ऊस उत्पादक शेतकèयांच्या आणि सहकारी साखर कारखान्यांच्या शाश्वत विकास आणि सक्षमतेसाठी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता साखर उद्याेगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करून चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणे हा या मागचा उद्देश आहे.कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिवेंद्रराजे भाेसले, हसन मुश्रीफ आदी उपस्थित राहणार आहेत.

जून महिन्यात इचलकरंजी येथे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बहुराज्य वर्गीकृत बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार कार्यक्रमप्रसंगी अमित शहा यांनी काेल्हापूर जिल्ह्यात सहकार तत्वावरील एक माेठा प्रकल्प राबविणार असल्याची घाेषणा केली हाेती. (Kolhapur) आता हा प्रकल्प हुपरी ( ता. हातकणंगले) येथे सुरु करण्याचे निश्चित केले आहे.सहभागी राष्ट्रीय संस्था यामध्ये नॅशनल काे-ऑप. डेव्हलपमेंट कार्पाेरेशन, इंडियन ार्मर्स फर्टीलायझर काे-ऑप. लि, कृषक भारती काे-ऑप.लि, नॅशनल काे-ऑप. एक्स्पाेर्टसब , नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बाेर्ड – अमूल आणि गुजरात काे-ऑप. मिल्क मार्केटींग, इंडियन पाेटॅश लि. आदी राष्ट्रीय पातळीवरील सहकार तत्वावरील नामांकित संस्थांची गुंतवणूक असणार आहे.

हा प्रकल्प वेस्ट टू बेस्ट या तत्वावर असणार आहे. (Kolhapur) साखर उद्याेगातील बगॅस, मळी, स्पेंट वाॅश आदी टाकावू घटकांवर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यापासून भारतात आयात करावे लागणारे पाेटॅश, सायट्रीक अ‍ॅसिड, सीबीजी गॅस आदींची निर्मिती हाेणार असल्याने परकिय चलनात माेठी वाढ हाेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या विकसित भारत तत्वावरील हा प्रकल्प आवाडे जवाहर कारखाना कार्यस्थळावर हाेणार आहे ही आनंदाची गाेष्ट आहे, असा उल्लेख आवाडे यांनी केला.पत्रकार परिषदेत इंडीयन पाेटॅशचे उपाध्यक्ष नरेश शर्मा, ऊस सल्लागार डाॅ. मल्लालीला, भानुजी, हर्ष मलिक, पणन व्यवस्थापक सयाजी पाटील, जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाे चाैगुले, प्रकाश दत्तवाडे उपस्थित हाेते.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?

 नांदणीत ‘माधुरी’ला पाहण्यासाठी गर्दी कायम?