डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे सोने आणि चांदीचे भाव धाड धाड कोसळले जागतिक बाजारात

सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत चढउतार बघायला मिळाला. (gold and silver) त्यातच आता सोन्याचे दर झपाट्याने घसरताना दिसत आहेत. तज्ज्ञांनी मोठा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवसात अजून सोने घसरण्याचा अंदाज आहे.

मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याचे भाव जवळपास 2 लाखाच्या आसपास गेले. मात्र, या युद्धाला सुरूवात झाली आणि सोने आणि चांदीचे भाव धाड धाड कोसळले. मोठी घसरण सोन्याच्या भावात झाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत आहे तर दुसरीकडे सोन्याचे भाव कोसळत आहेत. आजची सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोन्याचे भाव वधारतील, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडले. (gold and silver) त्यातच आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, सोने आणि चांदीच्या किंमती ज्याप्रकारे घसरत आहेत, त्याला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प कारणीभूत आहेत का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 2026 हे वर्ष सोने आणि चांदीसाठी आव्हानात्मक ठरत आहे. जानेवारी महिन्यात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.75 लाख रुपयांच्या वर होती. त्यावेळी ही किंमत 2 लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता ही किंमत 1.25 लाख रुपयांच्या दिशेने जात असल्याचे दिसते. चांदीची स्थिती तर अधिकच वाईट आहे. मध्यंतरी सोन्याचे दर वधारले होते. मात्र, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठे हल्ले सुरू करणार असल्याची घोषणा केली की, पुन्हा सोन्याचे दर कोसळताना दिसले. (gold and silver) अमेरिकेत महागाई वाढली आहे आणि ती लवकर कमी होईल असे वाटत नाही. परिणामी, लोक असे म्हणत आहेत की ट्रम्प यांच्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत. अमेरिकेत वाढलेल्या महागाईनेच सोने आणि चांदीच्या किंमती कमी झाल्याचे सांगितले जातंय. सोने आणि चांदीच्या किंमती कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. जेव्हा बाजारात एखाद्या वस्तूचा तुटवडा असतो परंतु खरेदीदार मात्र अनेक असतात, तेव्हा खरेदीदार ती वस्तू अधिक किंमतीत विकत घेण्यास तयार होतात आणि त्या वस्तूची किंमत वाढते. भारत सरकारने ग्राहकांनी अधिकचे सोने खरेदी करू नये, याकरिता ड्यूटीत मोठी वाढ केली. तरीही भारतात सोन्याची मागणी वाढत आहे.

हेही वाचा : 

देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे महेंद्र लाड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील

वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना