शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा ऐन दुष्काळात सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय, आता थेट

शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. आता ऐन दुष्काळात सरकारने गेमचेंजर निर्णय घेतला आहे. या निर्णयाने 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

फडणवीस सरकारने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. ऐन दुष्काळग्रस्त परिस्थितीत सरकारने गेमचेंजर निर्णय घेतला आहे. सरकारने आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या निर्णयाने 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Farmers) त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सरकारी मदत देखील मिळण्याची शक्यता आहे. ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दादरच्या रेल्वे स्टेशनच्या नामांतराबाबत म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण समाजाची मागणी पूर्ण केली. आता आवश्यक कारवाया पूर्ण करण्यात येईल. दादरला चैत्यभूमी नाव देण्यात येणार आहे, हा निर्णय राज्यातील एका ऐतिहासिक निर्णयापैकी एक राहणार आहे. मी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. (Farmers) त्यांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केली. ही ऐतिहासिक मागणी आहे’.

शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबाबत बावनकुळे म्हणाले, ‘आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील 6 तालुक्यांना दुष्काळ यादीत घेण्याचा निर्णय घेतला. यात विक्रमगड, दिंडोरी, रायगडमधील एक, पालघर जिल्ह्यातील मधील दोन..या तालुक्याबाबत निर्णय झाला. अशोकराव माने यांनी वारंवार पाठपुरावा केला. हातकणंगले तालुक्याचा समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यानंतर हातकणंगले तालुका देखील दुष्काळ यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मी अशोकराव माने यांचे मनापासून अभिनंदन करतो. गडहिंग्लज तालुक्याचा समावेश दुष्काळ यादीत करावा, अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली होती. ही मागणी सरकारकडून तपासण्यात आली. आज मुख्यमंत्र्‍यांनी देखील गडहिंग्लज तालुका देखील दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी मान्य केली. आता महाराष्ट्रातील आणखी सहा तालुके दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आले’.

‘या आधी 304 तालुक्यांचा समावेश दुष्काळ यादीत करण्यात आला होता. त्यानंतर 310 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. यासाठी हसन मुश्रीफ यांनीही प्रयत्न केले, त्यांचेही आभार मानतो. (Farmers) तसेच आणखी 13 तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी ली आहे. त्या मागण्यादेखील तपासण्याचे काम सरकार करेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे महेंद्र लाड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील

वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना