साखरेचे दर पुन्हा कडाडणार साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज साखरेचे नेमके दर किती वाढणार

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. यंदाच्या गाळप हंगामात देशातील साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन अर्थात ‘इस्मा’ने २०२६-२७ या हंगामातील साखर उत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. (sugar) त्यानुसार देशातील साखर उत्पादनात सुमारे ५ टक्क्यांची घट होऊन उत्पादन २६५ लाख टनांवर येण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्यास आगामी काळात साखरेचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये पिकाची परिस्थिती समाधानकारक नाही. काही राज्यांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे, (sugar) तर काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक असून, दुष्काळामुळे राज्यातील साखर उत्पादनात तब्बल १२ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादन ८७ लाख टनांपर्यंत खाली येऊ शकते.

यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशातील गाळपासाठी उपलब्ध असलेले ऊस क्षेत्रही सुमारे ३ टक्क्यांनी कमी झाले आहे. याशिवाय कर्नाटकातील साखर उत्पादनात ७ टक्के घट होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्येही उत्पादनात प्रत्येकी १ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून यंदा उसाचा रस आणि साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचाही या हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.दरम्यान, देशातील साखरेचे संभाव्य उत्पादन आणि वार्षिक वापर यामध्ये मोठी तफावत निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यंदा देशातील साखर उत्पादन किमान २६५ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, देशाची वार्षिक साखरेची गरज जवळपास २९० लाख टन आहे. त्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे २० लाख टन साखर आयात करण्याची वेळ येऊ शकते.

प्रतिकूल हवामान आणि घटत्या उत्पादनामुळे सप्टेंबर २०२७ अखेरपर्यंत देशातील साखरेचा शिल्लक साठा २० ते २५ लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वी भारताने मे महिन्यात अचानक साखर निर्यातीवर निर्बंध आणले होते. (sugar) तसेच १० लाख टन साखर आयातीला परवानगी दिली होती. मात्र, तरीही देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धतेबाबत चिंता कायम आहे.आता पुन्हा एकदा साखर आयातीचे संकेत मिळत असल्याने आगामी काळात साखर बाजारात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील घट, वाढती मागणी आणि कमी होणारा शिल्लक साठा यामुळे साखरेच्या किमती वाढू शकतात. परिणामी, साखरेच्या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा साखर हंगाम ग्राहकांसाठी महागाईचा ठरतो की सरकारच्या हस्तक्षेपामुळे दर नियंत्रणात राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या