IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये नायलॉन मांजाने पतंग उडवल्यास कडक कारवाई होणार

IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता नागपुरात नायलॉन मांजाने पतंग उडवल्यास कडक कारवाई होणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई होईल.

नागपुरातून मोठी बातमी हाती आली आहे. पंतग उडवण्यासाठी जीवघेणा मांजाचा वापर करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे. (Nangre Patil) नायलॉन मांजाचा वापर करून पंतग उडवणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागपूर पोलिसांकडून ही कारवाई केली जाणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत वृत्तपत्रात सार्वजनिक सूचना जारी करत नागपूरकरांना आवाहन केलं आहे.

नागपुरात प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास प्रत्येक उल्लंघनासाठी 25 हजार रुपये दंड आणि अल्पवयीन असल्यास दंडाची रक्कम पालकांकडून वसूल केली जाईल. विक्रेत्याकडून प्रत्येक उल्लंघनासाठी 2 लाख 50 हजार रुपये दंड करण्यात येईल. घटनास्थळी दंडाची रक्कम न भरल्यास 15 दिवसाचे आत नोटीस देण्यात येईल. (Nangre Patil) त्यानंतर देखील 15 दिवसात न भरल्यास सक्षम अधिकाऱ्यांमार्फत ‘जमीन महसूल’ म्हणून वसूल केला जाईल. नायलॉन मांजा वापर, विक्री किंवा साठ्याबाबत काही तक्रार असल्यास 112 या पोलिसांच्या हेल्पलाईनवर तक्रार करता येणार आहे. नागपूर सायबर पोलिस व्हाट्सअप क्रमांकवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार नागपूर पोलीस आयुक्तालयाने सर्वसामान्य जनतेसाठी या सूचना जारी केली आहे.

पोलीस, प्रशासन थेट कारवाई करणार दरम्यान, नायलॉन मांजामुळे अनेक दुचाकीस्वारांचे गळे कापल्याने गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या नायलॉन मांजामुळे काही दुचाकीस्वारांना प्राण देखील गमवावे लागले आहेत. (Nangre Patil) त्यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खरंतर महाराष्ट्रातील विविध भागात चायनीज मांजा, नायलॉन मांजाची विक्री होते. दुकानदारांकडून छुप्या पद्धतीने ही बंदी असलेल्या मांजाची विक्री केली जाते. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने या दुकानदारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील विविध भागातील पोलीस , प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या मांजा विक्रीवरून नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील काय कारवाई करातात, हे पाहावे लागेल.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या