कल्पनेच इवलंस बीज कर्तृत्वाचं विशाल विश्व निर्माण करत…!
आज हि आठवतंय १९ फेब्रुवारी २०१८ माणुसकी फौंडेशनची स्थापना झाली. दोनशे-अडीचशे तरुण मुले एकत्र येऊन समाजसेवेचा वारसा घेतला. पण या आधी रवि जावळे या नावाला ऐकून होतो. युवकांची ताकद यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात आहे, हे सुद्धा चांगलाच जाणून होतो. पण इतके युवक या व्यक्तिमत्त्वाच्या(humanity) मागे कसे काय उभे राहतात..? काय नेमकं आहे या व्यक्तिमत्वात..? हा नेहमी प्रश्न पडायचा. पण जस रवि दादांच्या सोबत फौंडेशनच्या कार्यात सक्रिय झालो तस या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला मिळू लागलं.

कोठे निराधार झोपून आहे समजलं की हा माणूस पहिला तिथं पोहचायचा, स्वतःच त्या निराधाराला अंघोळ घालायचा, स्वतःच त्याची दाढी करायचा, स्वतःच त्यांना नाविन कपडे घालून अगदी साहेबासारखा त्या निराधाराला नवंरूप द्यायचा. आणि हे काम मात्र सर्वांच्या हृदयाला भावायचं…! मग तरुण या व्यक्तिमत्वाच्या(humanity) मागे घोळखा का घालतात…? याच उत्तर मिळत गेलं.
मग समाजाच्या हिताचा कोणताही प्रश्न असो, या माणसाकडे न्याय मिळालाच समजा. मी खूप वेळा ऐकलंय न्हवे या आठ वर्षात त्याचा अनुभव घेतलाय. हा माणूस गेले अनेक वर्ष झाले दरवर्षी शेकडो मुलांचे ऍडमिशन अगदी मोफत करतोय. आज ही एखादा माणूस येतो आणि रवि दादांचे सरळ पाय धरतो. आणि सांगतो…! साहेब, त्यावेळेला परिस्थिती नसताना कॉलेजमध्ये तुम्ही मोफत ऍडमिशन घेऊन दिलंत, त्यामुळे मी शिकू शकलो आणि आज मी मोठ्या हुद्यावर आहे. असे अनेक प्रसंग मी स्वतः पाहीलेत.
लॉकडाउनच्या काळात तर, एक कुटूंब चालवताना लोकांना घाम फुटयचा पण रवि जावळे तर दररोज हजारो लोकांचे कुटूंब चालवत होते . माणुसकी फौंडेशनच्या माध्यमातून सलग 214 दिवस सकाळी पंधराशे व रात्री पंधराशे गरजू लोकांना मोफत जेवणाची व्यवस्था केली होती.

लंम्पि सारख्या जनावरांवर ओढवलेल्या आजारात तर लंम्पि रोगावर उपचार करणारी महाराष्ट्रातील पहिली छावणी रवि दादांनी माणुसकी फौंडेशनच्या माध्यमातून इचलकरंजीत उभी केली आणि शेकडो जनावरांना लंम्पि रोगापासून वाचवलं. त्या सोबत महापूर असो किंवा आलेलं कोणतही संकट असो हा माणूस माणुसकी फौंडेशनच्या माध्यमातून लोकांची सेवा करायला कायम तत्पर आहे.
एवढच न्हवे आज चार वर्षे उलटून गेली, शहराच्या हितासाठी IGM रुग्णालय सुरळीत व्हावं म्हणून रवि दादांनी चपलाचा त्याग केलाय. आज ही माणूस अनवाणी फिरतोय, अफाट करतोय समाजासाठी..इंदिरा गांधी रुग्णालय अलिकडील काळात सुव्यवस्थित होतंय यात मोलाचा वाटा रवि दादा जावळे यांचा आहे असं म्हणाल तर ती नक्कीच अतिशोक्ती ठरणार नाही.
लोक भेटली की दादांना म्हणतात….! दादा काय ओ ….! माझ्या कार्यक्रमाला सांगितल होत आला नाहीत तुम्ही….! त्यावेळी हा माणूस ठाम पणे त्यांना सांगतो, सुखात क्वचित कोठे तरी तुमच्या चार पाऊले मागे दिसेन, अथवा दिसणार ही नाही. पण दुःखात मागे बघूच नका. तुमच्या चार पाऊल पुढं बघा, तिथं रवि जावळे नक्कीच दिसेल.. हे शब्द मी ऐकलेत आणि नुसते ऐकले नाहीत ते प्रत्येकक्षात उतरवताना ही पाहीलेत.
मोठं मोठी पद या माणसानं सांभाळली आहेत. आणि आता तर माणुसकी(humanity) फौंडेशन संस्थापक अध्यक्ष हे पद या माणसाला राज्य पातळीवर पोहचवेल या बद्दल तीळ मात्र ही शंका नाही. पुनश्च एकदा स्वतः झिजून गरजूंना सेवा देणाऱ्या खऱ्या समाजसेवकाला जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रथमेश इंदुलकर
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय