मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग; परभणी, नांदेडसह हिंगोलीत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी

विभागीय आयुक्त कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, विभागातील हिंगोली,(rains) परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा अधिक जोर होता. येथील एकूण १६ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात आता मोठ्या खंडानंतर पावसाने पुन्हा जोरदार आगमन(rains) केले आहे. गुरुवारी, शुक्रवारी दिवसभरात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. विभागीय आयुक्त कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, विभागातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा अधिक जोर होता. येथील एकूण १६ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जवळपास आठवडाभरापासून पावसाची प्रतीक्षा होती. पावसाअभावी पिकेही सुकून जात होती. शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या काळात कडक ऊन पडत असल्यानेही पिकांना धोका निर्माण झाला होता. परंतु गुरुवारी सकाळी सात ते आठच्या सुमारास सर्वत्र पावसाने पुनरागमन करून दिलासा दिला. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात अधूनमधून पावसाची हजेरी सुरु होती.

विभागात गुरुवारी सकाळी ते शक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत(rains) एकूण १४. ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक ४८. ८ मिमी हिंगोली, त्यानंतर नांदेडमध्ये ३०. ० मिमी तर परभणी जिल्ह्यात २३. ५ मिमी पाऊस झाला आहे. या तिन्ही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, मराठवाड्यात पावसाची बॅटिंग सुरु झाली असली तरी संभाजीनगर, जालना, बीड, लातुरात मात्र पावसाने किरकोळ हजेरी दिल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

फक्त ५ मिनिटांत बनवा झटपट आणि चविष्ट ‘दही चटणी टोस्ट’!
तुमचे दात मोत्यांसारखे चमकतील, फक्त ‘ही’ एक गोष्ट तुमच्या टूथपेस्टमध्ये करा मिक्स
कॉनव्हेनंतर रचीन रवींद्र-हेनरी निकोल्सचा झंझावात, न्यूझीलंड 600 पार, झिंबाब्वे विरुद्ध 467 धावांची भक्कम आघाडी