अयोध्येच्या राम मंदिरात कशी व्हायची नोटांची चोरी? अत्यंत महत्वाची माहिती समोर?

अयोध्या येथील राम मंदिर दानपेटीतील कथित चोरी प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान दानपेटीतील नोटा मोजणीच्या वेळी नव्हे, तर त्याआधीच गायब केल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असून, (Ayodhya) आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोजणीपूर्वीच नोटा गायब होत असल्याचा संशय मिळालेल्या माहितीनुसार, दानपेटीत जमा झालेल्या रकमेची मोजणी मशीनद्वारे केली जात होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींची जबाबदारी दानपेटीतून आलेल्या नोटा सरळ करणे, त्यांची नीट मांडणी करणे आणि मोजणीसाठी तयार ठेवणे इतकीच होती. (Ayodhya) त्यानंतर भारतीय स्टेट बँक चे कर्मचारी या नोटा मशीनमध्ये टाकून मोजणी करत असत.तपासात असे समोर आले आहे की, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा वेगळ्या करून त्यांच्या गड्ड्या तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यानच काही नोटा लंपास केल्या जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे मोजणीदरम्यान नव्हे, तर त्यापूर्वीच चोरी होत असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. अद्याप अयोध्या पोलिसांनी एसबीआयच्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवलेले नसून, पुढील तपासात ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा आणि बँकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माजी बँक अधिकाऱ्यांसह संबंधितांची चौकशी होणार या प्रकरणात एसबीआयचे माजी व्यवस्थापक गोविंद मिश्रा हेही पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांची नियुक्ती लखनऊ येथे असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे ट्रस्ट आणि एसबीआय यांच्यातील सामंजस्य करारानुसार नियुक्त करण्यात आलेले थर्ड पार्टी आउटसोर्स कर्मचारी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांची नियुक्ती थेट ट्रस्ट किंवा बँकेकडून न होता, खासगी कंपनीमार्फत करण्यात आली होती. (Ayodhya) दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांचे काम भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या दुमडलेल्या नोटा सरळ करणे, त्यांची वर्गवारी करणे आणि मोजणीसाठी गड्ड्या तयार करणे इतकेच होते. तसेच नोटांची मोजणी सुरू असताना देखरेखीची जबाबदारी सांभाळणारे सुभाष श्रीवास्तव हेही माजी बँक कर्मचारी असून त्यांची नियुक्तीही एका खासगी आउटसोर्स कंपनीमार्फत करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, चौकशी पुढे सरकल्यानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?