‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

आज पहाटे दिल्लीतील जंतरमंतरवर मोठी घडामोड घडली. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपचारासाठी उचलले. तर अभिजीत दीपके यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. आंदोलन थांबणार नसल्याचे स्पष्ट करत त्याने आमरण उपोषणाची घोषणा केली. (Sonam Wangchuk) त्यावर अभिजितच्या आई-वडिलांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस होता. पहाटेच पोलिस जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांनी तातडीने वांगचुक यांना उचलून रुग्णालयात उपचारासाठी नेले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला. तर आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. (Sonam Wangchuk) त्याचवेळी आमरण उपोषणाची घोषणा केली. या सर्व घडामोडींवर अभिजितच्या आई-वडिलांनी समोर येत मोठी प्रतिक्रिया दिली.

सरकार दखल घेत नाही NEET परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी अभिजीत लढा देत आहे. त्याच्या नातेवाईक अथवा नात्यातील भावा-बहि‍णींसाठी तो लढत नाही. तो सर्वांसाठी लढा देत आहे. पण सरकार या आंदोलनाची कुठलीच दखल घेत नसल्याचा आरोप अभिजितची आई अनिता दीपके यांनी केला. तो धडपड करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो लढा देत आहे. 6 जून रोजी तो अर्धा तास तो घरी आला. सोनम वांगचुक यांना सरकारने उचलून नेले, हे चुकीचे केले आहे. सरकारला एकच सांगणे आहे की, मुलांचे म्हणणे ऐकून घ्या. (Sonam Wangchuk) त्याचे वडील दवाखान्यात दाखल होते, गेल्या शनिवारी अभिजीतशी बोलणे झाले. अशात त्याच्याशी बोललो नसल्याचे आईने सांगितले.

अभिजीत आमरण उपोषणाला बसला आहे, आमचा जीव कसा लागणार? असे म्हणत त्याच्या आईचा कंठ दाटून आला. आज सोनम वांगचुक यांना नेले. उद्या त्यालाही असेच उचलून नेले तर आम्ही काय करणार? वांगचुक यांना सकाळीच झोपेतून उचलून नेले. उद्या अभिजीतबाबत असेच झाले तर आम्ही काय आणि कुणाकडं न्याय मागणार असा सवाल अभिजीतची आई अनिता दीपके यांनी विचारला. त्यांनी मुलाविषयी मोठी चिंता व्यक्त केली.

ही तर हुकुमशाही झाली ना ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. तिथे कुठलीही हिंसा झाली नाही. जनता त्यांच्या बाजूने होती. दिल्ली आणि देशातील अनेक जण दिल्लीत त्यांची काळजी घेत होता. सरकारने सोनम वांगचुक यांना अशा प्रकारे अचानक उचलून न्यायची गरज नव्हती. सरकारने प्रतिनिधी पाठवून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. ही तर हुकुमशाही झाली ना. वांगचुक हे मोठे वैज्ञानिक आहे. त्यांनी देशाचा विचार करून उपोषणाला बसले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पाठिंबा दिला. वांगचुक यांना उचलून नेले म्हणजे हे आंदोलन संपून जाईल असे सरकारला वाटत होते. सरकारला हे आंदोलन मोडून काढायचे आहे. त्याला अमेरिकेत चांगली नोकरी मिळत होती. मी ही त्याला सांगितलं होतं की भारतात गढूळ वातावरण झालेले आहे, इकडे येऊ नको. राम मंदिर सोडलं नाही तर इतर माणसांची काय चिंता आहे या देशात? पण त्याने ऐकले नाही, असे अभिजीतचे वडील भगवानराव दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर परखड मत व्यक्त केले.

हेही वाचा :

शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?

12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी UIDAI मध्ये पदांची भरती सुरु?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?