नांदणी (ता. शिरोळ) येथील जिनसेन मठात माधुरी हत्तीणीला पुन्हा आणण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय संयुक्त समितीला ५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत समिती नांदणी येथील आवश्यक सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. या पाहणीनंतर तयार करण्यात येणारा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर केला जाणार असून, (elephant) त्यानंतर माधुरीच्या पुनरागमनाबाबत अंतिम निर्णयाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी २३ जून रोजी झालेल्या ऑनलाइन सुनावणीत उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत उच्चस्तरीय समितीचे सदस्य, सेंट्रल झू प्राधिकरणाचे प्रतिनिधी (elephant) तसेच महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीला नांदणी येथील हत्तीणीसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची तपासणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
सुरुवातीला या समितीला १३ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, ६ जुलै रोजी झालेल्या पुढील सुनावणीत समितीला आणखी ३० दिवसांची मुदत देण्यात आली. या कालावधीत समिती प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सूचना देऊ शकते. त्या सूचनांनुसार आवश्यक सुधारणा झाल्यानंतर अंतिम अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर केला जाणार आहे.संयुक्त समितीचा अहवाल आणि त्यातील शिफारशींवर पुढील निर्णय अवलंबून असल्याने, (elephant) नांदणीतील जिनसेन मठात माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हेही वाचा :
शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?
12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी UIDAI मध्ये पदांची भरती सुरु?