कल्याण शहरात एका रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीला परप्रांतीय गुंडाकडून अमानुष मारहाणीचा प्रकार समोर आला असून, आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा यांना अखेर अटक(arrested) करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गोकुळ झा या सराईत गुन्हेगाराने पीडित तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नव्हे तर तिला जमिनीवर फरफटत नेल्याने तिच्या मानेवर, छातीवर आणि पायावर गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, आरोपीला नांदिवली भागातून मानपाडा पोलिसांनी अटक(arrested) केली आहे. याआधी त्याच्यावर तीन गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
गुन्हेगारांना पोलिसांनी अटक; न्यायालयात हजर :
या प्रकरणातील आरोपी गोकुळ झा आणि रणजीत झा यांना आज दुपारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात पाच दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची तयारी केली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या इतर लोकांचे नातेवाईकही संशयाच्या भोवऱ्यात असून, त्यांची चौकशी सुरू आहे. लवकरच इतरांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पीडित तरुणीवर सध्या जानकी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, डॉक्टर मोईन शेख यांनी सांगितले की, तिच्या मानेवर मोठा आघात झाल्यामुळे तिला हालचाल करताना प्रचंड वेदना होत आहेत. जर वेळेवर उपचार झाले नाहीत तर पॅरेलिसिससारखा धोका निर्माण होऊ शकतो, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.
मनसेची सक्रीयता; अविनाश जाधवांचा इशारा :
या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीला भेट देऊन पक्षातर्फे सर्व उपचार खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटलं की, “आम्ही तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेऊ.” तसेच त्यांनी पोलिस प्रशासनालाही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी दबाव टाकला आहे.
अविनाश जाधव यांनी परप्रांतीय गुंडांविरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त करत म्हटलं, “युपी-बिहारमधील गुन्हेगार महाराष्ट्रात येऊन धंदे करतात आणि स्थानिकांवर हात उचलतात, हे खपवून घेतलं जाणार नाही. पोलिसांनी वेळेत कारवाई न केली, तर मनसे पद्धत दाखवेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा :
नीता अंबानींची अनोखी साडी, तयार करण्यासाठी लागले तब्बल 10 महिने!
अंतराळातून परतल्यानंतर शुभांशू शुक्ला यांची काय अवस्था झाली पाहा; VIDEO व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात; चालत्या कारमधून फेकला गेला, व्हिडीओ व्हायरल