इचलकरंजी महानगरपालिकेच्या दुसऱ्या सहामाहीच्या घरफाळा सवलत योजनेची(demands)अंतिम मुदत १५ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली होती मात्र शहरातील अनेक भागांमध्ये घरफाळा बिले नागरिकांना वेळेत मिळाली नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत त्यामुळे बरेच नागरिक ही सवलत मिळण्यापूर्वीच मुदत संपल्याने लाभ घेण्यास अपयशी ठरलेत १४ जुलै अखेर फक्त ५,५३२ मिळकतधारकांनीच सवलतीचा लाभ घेतला आहे ही संख्या इचलकरंजीतील एकूण मिळकतींच्या केवळ १० टक्के इतकी असून उर्वरित ९० टक्के मिळकतधारक सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे

या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नागरिक (demands)मंचने महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत सवलतीच्या योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना योजना समजून आणि बिले मिळाल्यावर वेळेत भरून सवलतीचा लाभ घेता येईल असा मंचचा आग्रह आहेमहापालिकेने देखील याबाबत सकारात्मक भूमिका घेत त्वरीत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांमध्ये आहे यामुळे नागरिकांचा कर भरण्याकडे ओढा(demands)वाढून महसूल संकलनातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :
मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल
मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत ‘नको ते घडलं’; परिसरात खळबळ
पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO