भारतात डेंग्यूवरील पहिल्या लसीला मंजुरी ४ ते ६० वयोगटाला मिळणार संरक्षण?

डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. (dengue) देशात प्रथमच डेंग्यूवरील लसीला मंजुरी मिळाली असून ती ४ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

भारतात प्रथमच डेंग्यूवरील ‘क्यूडेंगा’ लसीला मंजुरी मिळाली.ही लस ४ ते ६० वर्षे वयोगटासाठी असून पूर्वी डेंग्यू झाला होता की नाही, याची तपासणी आवश्यक नाही. लसीचे दोन डोस दिले जाणार असून त्यांचे उत्पादन ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतातच होणार आहे.भारतात पहिल्यांदाच डेंग्यूच्या लसीला मंजुरी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ताकेडा क्यूडेंगा लसीला बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या वापरण्याची परवानगी दिली आहे. बाजारात कंपनीनुसार, ही लस ४ ते ६० वर्षांपर्यंतच्या लोकांना दिली जाऊ शकते. ही लस घेण्यापूर्वी व्यक्तीला यापूर्वी कधी डेंग्यूची लागण झाली होती की नाही, याची तपासणी करण्याची गरज भासणार नाही. ताकेडाच्या मते, भारत जगातील डेंग्यूने सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक आहे.

कंपनीचे वैद्यकीय व्यवहार प्रमुख गोह चू बेंग यांनी सांगितले की, क्यूडेंगाला चारही सेरोटाईपपासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. ही मंजुरी भारतात डेंग्यू प्रतिबंधाच्या रणनीतीला बळकटी देईल. (dengue) यासोबतच मच्छर नियंत्रण, पाळत ठेवणे, जनजागृती आणि इतर सार्वजनिक आरोग्य उपाययोजना देखील आवश्यक राहतील. कंपनीने असेही म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) डेंग्यू प्रभावित क्षेत्रांमध्ये क्यूडेंगाच्या वापराची शिफारस करते.

भारतात मिळालेली मंजुरी ताकेडाच्या जागतिक क्लिनिकल डेव्हलपमेंट प्रोग्रामवर आधारित आहे. या अंतर्गत, फेज-1 फेज-॥ आणि फेज-III चे एकूण १९ क्लिनिकल ट्रायल्स करण्यात आले, ज्यात २८ हजारांहून अधिक लोकांनी भाग घेतला. क्यूडेंगाचे दोन डोस दिले जातात, प्रत्येक डोस ०.५ मिलीलीटरचा असतो आणि त्वचेखाली इंजेक्शनद्वारे दिला जातो. दोन्ही डोसमध्ये तीन महिन्यांचे अंतर ठेवले जाते.राम मंदिर दानचोरीप्रकरणी नवीन SIT स्थापन करा; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश देशातच होईल उत्पादन ‘क्यूड़ेगा’ (टाक-००३) ही जपानी कंपनी ताकेडाने शोधलेली लस आहे, पण आपल्यासाठी सर्वांत मोठी दिलासादायक बाब म्हणजे ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन देशातच होईल. (dengue) यासाठी टाकेडाने हैदराबादमधील प्रसिद्ध फार्मा कंपनी ‘बायोलॉजिकल ई ‘सोबत करार केला आहे. भारतातच उत्पादन होत असल्यामुळे याचा पुरवठा जलद आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय होईल.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?